

भेसळयुक्त दूध प्यायल्याने १३ जणांचा मृत्यू
दूध विषबाधेमुळे किडनी फेल झाल्याची प्रकरणे समोर
आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील धक्कादायक घटना
डेअरीमधील दूध भेसळ प्रकरणाची चौकशी सुरू
आंध्र प्रदेशमध्ये दूध प्यायल्यानंतर १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात भेसळयुक्त दूध सेवन केल्यामुळे या सर्वांचा मृत्यू झाला. तर ११ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी २२ फेब्रुवारी रोजी दूध प्यायल्यानंतर आजारी पडल्याची अनेक प्रकरण उघडकीय आल्याचे सांगितले. दूध प्यायल्यानंतर अनेक वृद्धांना लघवी करण्यास त्रास, काहींना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. धक्कादायक बाब म्हणजे या दुधामुळे काहींना किडनीचा त्रास झाला आणि त्यांना डायलिसिस करावे लागले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, भेसळयुक्त दुधामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. राजा महेंद्रवरम येथील रुग्णालयामध्ये ११ जणांवर उपचार सुरू आहेत. दुधाचे नमुने तपासणीसाठ पाठवण्यात आले होते त्यामध्ये भेसळ असल्याचे आढळून आले. दूध प्यायल्यानंतर विषबाधा झालेल्या व्यक्तींच्या रक्त आणि लघवीमध्ये युरियासह सीरम क्रिएटिनिनची पातळी वाढल्याचे आढळून आले.
२२ फेब्रुवारी रोजी भेसळयुक्त दूध पिऊन लोक आजारी पडल्याची प्रकरणे नोंदवली गेली होती. वरलक्ष्मी मिल्क डेअरी कोरूकोंडा मंडल परिसरातील एका गावामध्ये अंदाजे १०६ कुटुंबांना दुधाचा पुरवठा करत होती. दुधातून विषबाधा झाल्याची प्रकरण समोर आल्यानंतर दुधाचा पुरवठा तात्काळ थांबवण्यात आला. याप्रकरणी संशयित दूध विक्रेता अदाला गणेशेश्वर राव (३३ वर्षे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीच्या डेअरी युनिटमधून दूध, चीज, तूप आणि पिण्याच्या पाण्याचे नमने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, शेजारच्या तेलंगणाने नागरिकांना विकल्या जाणाऱ्या मिठाई, स्नॅक्स आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी राज्यव्यापी भेसळ विरोधी मोहीम सुरू केली आहे. १४० ठिकाणांची तपासणी करण्यात आली जिथून २२१ अन्न नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या दरम्यान १२ असुरक्षित अन्नपदार्थ टाकून देण्यात आले आणि तर आठ पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.