Cholesterol: नारळाच्या दुधामुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका? कोलेस्टेरॉलवरही होतो 'हा' परिणाम, जाणून घ्या सत्य

Heart Attack: नारळाचं दूध आरोग्यासाठी फायदेशीर की धोकादायक? कोलेस्टेरॉल, हृदय आरोग्य आणि हार्ट अटॅकच्या जोखमीवर त्याचा नेमका परिणाम काय? जाणून घ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासह.
coconut milk cholesterol
coconut milk healthgoogle
Published On

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. लोक दिवसरात्र मेहनत घेत असतात, काम करत असतात, त्यासाठीलोक लांबलांब पर्यंत प्रवास करत असतात. पण तुम्हाला माहितीये का? तुम्ही वेळेवर किंवा चुकीचा आहार घेतल्याने तुमच्या शरीरावर त्याचा खूप परिणाम होतो.

त्यामुळे तुमच्या शरीरातल्या चांगल्या अवयवांचं नुकसान व्हायला लागतं. मग तुम्हाला डॉक्टरांकडे जावून त्यावर उपचार करावे लागतात. त्यादरम्याने ते तुम्हाला आहाराच्या बाबतीतही काही गोष्टी बजावून सांगतात. त्या फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे.

काही घरांमध्ये गृहीणींना स्वयंपाकात खोबरं वापरण्याची सवय असते. पण ज्या व्यक्तींना कोलेस्टेरॉलच्या समस्या आहेत, त्यांनी खोबरं किंवा त्याचे विविध पदार्थ खाणं योग्य ठरु शकतं का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

दुग्धजन्य पदार्थ टाळणारे, लॅक्टोज इन्टॉलरन्स असलेले किंवा व्हेगन आहार घेणारे लोक त्यांच्या नेहमीच्या आहारात कोकोनट मिल्कचा वापर करतात.

coconut milk cholesterol
Ajit Pawar Family Photos: अजित पवारांचे अविस्मरणीय क्षणांचे काही फोटो! पाहून डोळ्यात येईल पाणी...

ओल्या नारळाच्या किसलेल्या किसापासून तयार होणारे हे दूध चवीलाही चांगले लागतात. पण त्यामध्ये असणारे सॅच्युरेटेड फॅट तुमच्या कोलेस्टेरॉल आणि हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे.

नारळाच्या दुधात मीडियम-चेन ट्रायग्लिसराइड्स (MCTs) आणि लॉरिक अ‍ॅसिड असतं. जे शरीरातली चरबींपेक्षा वेगळ्या पद्धतीने पचवतात किंवा कमी करतात. यातलं लॉरिक अ‍ॅसिड लिव्हरमध्ये थेट ऊर्जेत रूपांतरित होतं, त्यामुळे चरबी साचून राहत नाही. काही अभ्यासांनुसार, यामुळे HDL म्हणजेच ‘चांगला’ कोलेस्टेरॉल वाढण्यास मदत होऊ शकते.

HDL वाढल्याने रक्तवाहिन्यांमधले जास्त कोलेस्टेरॉल बाहेर निघतं. यामुळे तुमचा भविष्यातला हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. पण लक्षात घ्या की, कोकोनट मिल्कमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते सतत प्यायल्याने LDL म्हणजेच ‘वाईट’ कोलेस्टेरॉल वाढू शकतो. काही संशोधनांमध्ये असं आढळून आलं की, नारळापासून तयार होणारे प्रोडक्ट्स इतर वनस्पती तेलांच्या तुलनेत LDL वाढवू शकतात. त्यामुळे हार्ट अटॅकची वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सूचना: हा लेख माहितीच्या उद्देशाने आहे. आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

coconut milk cholesterol
Myra Vaikul: लहान वयात ट्रोलिंग नको! मायरा वायकुळच्या पालकांचा धाडसी निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com