Myra Vaikul: लहान वयात ट्रोलिंग नको! मायरा वायकुळच्या पालकांचा धाडसी निर्णय

Social Media Trolling: लहान वयात होणाऱ्या ट्रोलिंगपासून मायरा वैकुळला वाचवण्यासाठी तिच्या पालकांनी सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
Myra Vaikul Instagram Closed
Myra Vaikul saam vtvtv
Published On

सध्या प्रत्येकाला त्याच्या कला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया खूप मदत करतंय. अगदी गृहीणींपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच सोशल मीडियाचा फायदा होत आहे. त्यामध्ये त्यांना त्यांच्या लाइफस्टाइलबद्दल कामांबद्दल आणि मिळवलेल्या यशाबद्दलही अनेक गोष्टी शेअर करायला मिळतात. पुढील बातमीत आपण सगळ्यांच्या मनात घर करुन राहणाऱ्या मायरा वायकुळबद्दल जाणून घेणार आहोत.

मायरा वायकुळ ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला तिचे कोणतेही रिल्स किंवा फोटो पाहायला मिळाले नसतील. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधून अवघ्या महाराष्ट्राची लाडकी ठरलेली छोटी मायरा वायकुळ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

Myra Vaikul Instagram Closed
Airplane Facts: विमान क्रॅश झालं, अचानक इंजिन बंद पडलं तर...त्याक्षणी काय करावं, वाचा सविस्तर

मालिकेत ‘परी’च्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली मायरा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिसत नसल्याने चाहते संभ्रमात पडले होते. अखेर यामागचं कारण समोर आलं असून, मायराचे आई-वडील श्वेता आणि गौरव वायकुळ यांनी एक महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेत तिचं अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट बंद केलं आहे.

गेल्या काही काळात मायराच्या रिल्सवर संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. अनेक जण तिच्या निरागस अभिनयाचं कौतुक करत होते, तर काही युजर्सकडून तिला ट्रोलही केलं जात होतं. लहान वयात अशा नकारात्मक प्रतिक्रियांचा मानसिक परिणाम होऊ नये, याच कारणामुळे पालकांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे, मायरासोबतच तिचा लहान भाऊ व्योम याचंही सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आलं आहे. नुकताच व्योमचा बोरन्हाण सोहळा पार पडला असून, त्याचा व्हिडिओ श्वेता वैकुळ यांनी शेअर केला होता. मात्र, या व्हिडिओमध्ये मायरा किंवा व्योम यांना कुठेही टॅग करण्यात आलेलं नव्हतं, ज्यामुळे चाहत्यांचं लक्ष या गोष्टीकडे वेधलं गेलं.

सोशल मीडियापासून दूर गेली असली, तरी अभिनयाच्या क्षेत्रात मात्र मायरा पूर्णपणे सक्रिय आहे. अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतीच एका नवीन मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, या चित्रपटाचं नाव ‘मर्दिनी’ असं आहे. विशेष बाब म्हणजे, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील सुपरहिट त्रिकुट – श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे आणि मायरा वैकुळ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी आणि अभिजीत खांडकेकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. त्यामुळे छोट्या मायरा वायकुळला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

Myra Vaikul Instagram Closed
Ajit Pawar Family Photos: अजित पवारांचे अविस्मरणीय क्षणांचे काही फोटो! पाहून डोळ्यात येईल पाणी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com