Airplane Facts: विमान क्रॅश झालं, अचानक इंजिन बंद पडलं तर...त्याक्षणी काय करावं, वाचा सविस्तर

Air Travel Safety: उड्डाणादरम्यान विमानाचं इंजिन बंद पडलं तर काय होतं? विमान ग्लाइड कसं करतं, पायलट काय निर्णय घेतात आणि आधुनिक विमान किती सुरक्षित आहेत याची सविस्तर माहिती.
aircraft engine shutdown
airplane engine failuregoogle
Published On

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या मृत्युचं कारण म्हणजे विमानाचा झालेला अपघात आहे. हे खाजगी विमान VSR कंपनीचे होते. पण अनेकदा प्रवाशांना विमानात बसल्यावर आपत्कालीन वेळेस कोणती काळजी घ्यावी हे सांगितलं जातं. पण याबद्दल तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे.

सर्वसामान्यांचं स्वप्न असतं की, आकाशातून हजारो फूटांवरुन संपूर्ण प्रवास केला पाहिजे. पण अनेकांच्या मनात भीती असते. जर उड्डाणादरम्यान विमानाची सर्व इंजिनं अचानक बंद पडली, तर विमान थेट खाली कोसळेल का? पुढे आपण या प्रश्नाचं उत्तर विमानशास्त्रांकडून जाणून घेणार आहोत.

aircraft engine shutdown
Kia India 2026: लोकांच्या पसंतीस उतरलेली New Kia Seltos कारमध्ये मोठे बदल, जाणून घ्या नवे फिचर्स

नेवाडा विद्यापीठातील प्राध्यापक आणि माजी पायलट डॅनियल बब यांच्या मते, कमर्शियल विमानं ही Advanced Technology ने डिझाइन केली जातात. ही विमानं फक्त एका इंजिनच्या मदतीनेही सुरक्षितपणे उड्डाण करू शकतात आणि लँडिंग घेऊ शकतात. उड्डाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विमानाला जास्त शक्तीची गरज असते. जेव्हा विमान क्रूझिंग उंचीवर पोहोचतं तेव्हा त्याला हवेत टिकून राहण्यासाठी कमी ऊर्जेची आवश्यकता असते.

जर उड्डाणादरम्यान विमानाचं एक इंजिन निकामी झालं, तरी दुसरं इंजिन इतकं शक्तिशाली असतं की ते विमानाला जवळच्या सुरक्षित विमानतळापर्यंत सहज घेऊन जाऊ शकतं. यासाठी पायलटांना विशेष प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यामुळे एक इंजिन बंद पडणं ही आपत्कालीन पण नियंत्रणात ठेवता येणारी परिस्थिती मानली जाते.

मात्र अनेकांना वाटतं की इंजिन अचानक हवेतच बंद पडलं तर काय होईल? यावर तज्ज्ञ सांगतात की, विमानात ‘ग्लाइड’ करण्याची क्षमता असते. जसं कागदी विमान किंवा पॅराग्लायडर कोणत्याही मोटरशिवाय हवेत तरंगत राहतं, त्याच प्रमाणे मोठं कमर्शियल विमानही इंजिनशिवाय काही वेळ हवेत राहू शकतं. खूप उंचीवर असलेलं विमान इंजिन बंद झाल्यानंतरही सुमारे 20 ते 30 मिनिटं हवेत राहू शकतं. हा वेळ पायलटांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण याच काळात ते सुरक्षित लँडिंगसाठी योग्य ठिकाण शोधू शकतात.

विमान जेव्हा त्याच्या कमाल उंचीवर असतं आणि इंजिन बंद पडतात, तेव्हा ते लगेच खाली कोसळत नाही. विमान हळूहळू खाली येतं आणि या दरम्यान पायलट विमानाच्या कंट्रोल्सचा वापर करून ते जवळच्या रनवे, विमानतळ किंवा सुरक्षित सपाट जागेकडे वळवलं जातं. विमानाची इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथे इंजिन फेल होऊनही पायलटांनी विमान यशस्वीपणे ग्लाइड करून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

हवाई प्रवासाबाबत भीती वाटणं साहजिक असलं, तरी आकडेवारी आणि तंत्रज्ञान वेगळीच गोष्ट सांगतं. विमान प्रवास हा आजच्या घडीला सर्वांत सुरक्षित वाहतूक प्रकारांपैकी एक मानला जातो. आधुनिक विमानांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असतात आणि कोणत्याही यांत्रिक बिघाडासाठी नेहमीच बॅकअप सिस्टीम उपलब्ध असते. त्यामुळे पुढच्या वेळी विमानातून बाहेर ढग, वीज किंवा आकाश पाहताना हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या विमानात बसला आहात, ते प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठीच तयार करण्यात आलेलं असतं.

aircraft engine shutdown
Blood Pressure: ब्लड प्रेशरच्या औषधांनी चक्कर येतेय? वेळीच व्हा सावध; वाचा डॉक्टरांनी सांगितलेले दुष्परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com