Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला? विमान कंपनीने सांगितलं खरं कारण

Ajit Pawar Passes away in Plane Crash Reason Behind Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज सकाळी अपघात झाला. हा अपघात होण्यामागचे नेमकं कारण काय हे विमान कंपनीने सांगितले आहे.
Ajit Pawar Death
Ajit Pawar DeathSaam Tv
Published On

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले आहे. अजित पवारांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी अजितदादा मुंबईहून बारामतीला जात होते. बारामती एअरपोर्ट येथे लँडिंगवेळी हा अपघात झाला. अजितदादा प्रायव्हेट विमानातून बारामतीला जात होते. दरम्यान, अपघात होण्यामागचे नेमके कारण काय याबाबत विमान कंपनीने माहिती दिली आहे.

Ajit Pawar Death
Ajit Pawar Baramati Plane Crash: बारामतीत अजित पवारांच्या विमानाचा अपघात, नेमकं काय घडलं?

विमान अपघाताचे नेमके कारण काय?

अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान व्हीएसआर कंपनीचे होते. या कंपनीने विमान अपघाताबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीच्या म्हणण्यांनुसार, विमान पूर्णतः सुरक्षित होते. त्यावर कार्यरत असलेले दोन्ही पायलट अत्यंत अनुभवी आहेत. प्राथमिक माहितीनुसार कमी दृश्यमानतेमुळे (विजिबिलिटी कमी असल्याने) ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) करणार असल्याचेही VSR एविएशनने स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar Death
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा; रितेश देशमुख ते सुबोध भावे, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

अजित पवार आज सकाळी ७.३० च्या सुमारास मुंबई येथून बारामतीकडे रवाना झाले होते. त्यांच्या विमानाचा ८.४५ च्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अजित पवारांसह एकूण ६ जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचे सुरक्षारक्षक आणि वैमानिक असे एकूण ६ जण बारामतीला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अपघातानंतर आता बारामती रुग्णालयाबाहेर खूप गर्दी झाली आहे. अजित दादांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे.

Ajit Pawar Death
Ajit Pawar Plane Accident Place: अजित पवारांचा अपघात झाला ते ठिकाण कुठं आहे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com