Sakshi Sunil Jadhav
सध्या प्रत्येकालाच मस्त जीवनशैली आवडते. त्यामुळे त्यांना कार घेणं खूप गरजेचं वाटत आहे.
पुढे आपण नव्या किआ सेल्टोस फेसलिफ्टची माहिती आणि खास फिचर्सबद्दल जाणून घेणार आहोत.
नुकतीच किआ मोटर्स इंडियाने इंडियन मार्केटमध्ये एक पॉप्युलर मिड साइज SUV किआ सेल्टोस फेसलिफ्ट रिवील केली आहे.
कंपनीने या कारचा लूक जरा वेगळ्या आणि हटके स्टाईलने तयार केला आहे. त्यामध्ये फ्रंटला टायगर ग्रिल, LED प्रोजेक्शन हेडलॅप, कॉर्नर साइडमध्ये डे टाईम रनिंग लॅम्प्स देण्यात आले आहेत.
कारच्या खाली स्किड प्लेट देण्यात आली आहे. त्यामुळे कारचा लुक आधीपेक्षा जास्त बोल्ड झाला आहे. तसेच व्हीलबेसमध्ये 80 मिमी वाढ करण्यात आली आहे.
बूट स्पेसमध्ये 14 लिटरची वाढ झालीये. कारची एकूण लांबी आता 4.4 मीटर झाली आहे. त्यामुळे तुम्हाला कारमध्ये जास्त स्पेस मिळणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये 21 ऑटोनॉमस लेव्हल-2 ADAS फीचर्स देण्यात आले आहेत. याने ड्रायव्हिंग जास्त सुरक्षितपणे करता येईल.
साइड प्रोफाइलमध्ये फ्लश डोअर हँडल्स, रूफ रेल्स आणि बॉडी क्लॅडिंग देण्यात आली आहे. रियरमध्ये L-शेप LED टेललॅम्प, कनेक्टेड LED टेललॅम्प, स्पॉइलर आणि टाटा सिएराप्रमाणे हिडन वायपर देण्यात आला आहे.
कारमध्ये शार्क-फिन अँटेना आणि रियर डॅशकॅम देण्यात आला आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 11.20 लाख रुपये असू शकते.