Myra Vaikul Dance
Myra Vaikul DanceSaam Tv

Myra Vaikul Dance: लाल साडी अन् कपाळी मळवट, नवरात्रीनिमित्त छोट्या मायराचा 'लल्लाटी भंडार...' गाण्यावर स्पेशल डान्स, VIDEO

Myra Vaikul Dance Video: शारदीय नवरात्रीनिमित्त बालकलाकार मायरा वायकुळने लाल नऊवारी साडीत देवीच्या गाण्यावर पारंपारिक गरबा डान्स केला आहे. तिच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Published on

शारदीय नवरात्रीचा उत्सव सर्वत्र सुरू आहे. अनेक सेलिब्रिटीपासून ते सर्वसामान्य गरब्याचा आनंद लुटताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी हे गरबा कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत आहे. नवरात्रीत रंगाना विशेष महत्व आहे. अनेक महिला व मुली तसेच सेलिब्रिटी हे रंग फॉलो करतात आणि नवीन वस्त्र परिधान करतात. नुकतच बालकलाकर मायरा वायकुळ हिने तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मायराने खास नवरात्रीनिमित्त देवीच्या गाण्यावर रिल्स शेअर केला आहे.

Myra Vaikul Dance
Orry And Urfi News: ओरीने घेतलं उर्फीचं चुंबन, म्हणाला 'आम्ही नवरा-बायको...' Video व्हायरल

मायरा वायकुळ ही सर्वांनाच माहित आहे. अत्यंत छोट्या वयात मायराने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मायराने नवरात्रीनिमित्त देवीच्या गाण्यावर डान्स केला आहे. 'नदीच्या पल्याड' असं गाण्याचे नाव आहे. मायराने पारंपारिक अंदाजात खास डान्स केला आहे. मायराच्या चेहऱ्यावरील हाव भाव पाहून तुम्ही देखील तिच्या डान्सचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

लाल रंगाच्या नऊवारी साडीमध्ये मायराने कपाळी देवीचा भंडारा लावला आहे. तिने साजश्रृंगार देखील केला आहे. ज्यामुळे तिचा लूक उठून दिसत आहे. सोशल मीडियावर मायराचा डान्सचे सर्वजण कौतुक करत आहे. तर अनेक चाहत्यांनी शारदीय नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Myra Vaikul Dance
Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com