Orry And Urfi News
Orry And Urfi NewsSaam Tv

Orry And Urfi News: ओरीने घेतलं उर्फीचं चुंबन, म्हणाला 'आम्ही नवरा-बायको...' Video व्हायरल

Orry And Urfi Viral Video: सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद आणि ओरी यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. “आम्ही नवरा-बायको आहोत” असं ओरी म्हणाल्यामुळे नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया ओसंडून वाहत आहेत.
Published on

सोशल मीडिया स्टार ओरी आणि उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा हे दोघेही त्यांच्या अंतरगीपणामुळे लक्ष वेधून घेतात. नुकतंच या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. या दोघांचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Orry And Urfi News
Rihanna : लोकप्रिय गायिका झाली आई; दिला गोंडस मुलीला जन्म, पाहा बाळाचा फर्स्ट लूक

उर्फी आणि ओरी ही जोडी त्यांच्या हटके अंदाजामुळे ओळखली जाते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अत्यंत मजेशीर अंदाजात दोघेही आनंदी दिसत आहेत. मॅचिंग आऊटफिट दोघांनीही घातला आहे. दरम्यान ओरी उर्फीचं चुंबन घेताना दिसत आहे.

या दोघांनाही पापाराझीनी स्पॉट केलं आहे. यामध्ये ओरी आणि उर्फी कॅमेऱ्यासमोर एकत्र पोज देतात. यावेळी पापाराझी या दोघांना गर्लफ्रेंड अन् बॉयफ्रेंड असं विचारतात तेवढ्यातच ओरी उर्फीला चुंबन घेत म्हणतो, आम्ही नवरा- बायको आहोत.

सोशल मीडियावर सध्या या दोघांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला माहितच असेल यापूर्वी देखील उर्फी आणि ओरी एकत्र फिरताना दिसले आहे. उर्फी जावेद ही तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते.

Orry And Urfi News
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीची EOW करणार चौकशी, नेमकं काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com