Marathi Actress: 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, ते पण नवरात्रीत'; 'बोल्ड' फोटोशूटमुळं मराठी अभिनेत्री ट्रोल

Marathi Actress Bold Photoshoot: मराठी अभिनेत्री अक्षया नाईकच्या बोल्ड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. नवरात्रीत शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Marathi Actress Bold Photoshoot
Marathi Actress Bold PhotoshootSaam Tv
Published On

अभिनेत्री अक्षया नाईकने अनेक मालिका व चित्रपटातून प्रेक्षकाचं मनोरंजन केलं आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून अक्षया दिसली. मालिकेत तिची महत्वाची भूमिका होती. मराठमोळी अभिनेत्री अक्षया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नुकतेच अक्षयाने बोल्ड फोटोशूट करत सोशल मीडियाचा तापमन वाढवलं आहे. न्यूड फोटोशूटमुळे अभिनेत्री आता ट्रोल होत आहे.

Marathi Actress Bold Photoshoot
Nilesh Sable-Bhau Kadam : मनोरंजनाचा डबल बोनस; निलेश साबळे-भाऊ कदम दिवाळी गाजवणार, कुठे अन् कशी पाहा?

सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर अक्षयाने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोशूटमध्ये न्यूड लूकमध्ये अक्षया दिसत आहे. या फोटोमध्ये अक्षयाने निळ्या रंगाची साडी लपटलेली आहे. साडीवर तिने ब्लाऊज घातलेला नाही. अक्षयाचा जबरदस्त हॉट लूक दिसत आहे. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी न्यूड फोटोशूटमुळे ट्रोल देखील केलं आहे.

इज्जत घालवायची नसते. ही भारतीय परंपरा नाही आहे.. प्रसिद्धी साठी ही लोक कोणत्या थराला जातील ह्याचा भरोसा नाही.. अक्षयाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. तर एका युजरने, लाज, लज्जा सोडलीये आजकाल या अभिनेत्रीने अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी हे अजिबात पटलं नाही असंही म्हंटलय. सध्या सोशल मीडियावर अक्षयाच्या फोटोंची भलतीच चर्चा सुरू आहे.

Marathi Actress Bold Photoshoot
'Bigg Boss 19'च्या घरात तान्या मित्तल झाली राजकुमारी; अमाल मलिकने स्वतःच्या हातांनी जेवण भरवले, पाहा VIDEO

अभिनेत्रीनं का केल फोटोशूट?

या फोटोशूटच्या माध्यमातून अक्षयाने न्यूड चित्रपटातील यमुना या भूमिकेबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिने कॅप्शनमध्ये, 'यमुनेचा न्यूड मधला प्रवास हा केवळ कलेसाठी पोझ देण्याबद्दल नाही, तर तो तिच्या शरीरावर, तिच्या निवडींवर आणि तिच्या सन्मानावर पुन्हा हक्क सांगण्याच्या धाडसाबद्दल आहे असं सांगितलं आहे.'

रवी जाधव सरांच्या न्यूड सिनेमातली यमुनाने ही शिकवण दिली की धैर्य कधीच गोंगाट करत नाही. तर शांत आणि लवचिक असतं त्यामुळे अनेकदा त्याबद्दल गैरसमज होतात. तिची कहाणी आपल्याला ही आठवण करून देते की कधी कधी स्त्रीने घ्यायचा सर्वात धाडसी निर्णय म्हणजे जगाने समजून नाही घेतले तरीही सन्मानाने जगणं अस म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com