Nilesh Sable-Bhau Kadam : मनोरंजनाचा डबल बोनस; निलेश साबळे-भाऊ कदम दिवाळी गाजवणार, कुठे अन् कशी पाहा?

Nilesh Sable-Bhau Kadam Diwali Special Show: निलेश साबळे आणि भाऊ कदम दिवाळी निमित्त खास शो घेऊन आले आहे. शोमध्ये नेमकं काय काय होणार, जाणून घेऊयात.
Nilesh Sable-Bhau Kadam Diwali Special Show
Nilesh Sable-Bhau KadamSAAM TV
Published On
Summary

स्टार प्रवाह वाहिनीने नवीन कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

नवीन कार्यक्रमात निलेश साबळे आणि भाऊ कदम झळकणार आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर कार्यक्रम सुरू होणार आहे.

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी निमित्त स्टार प्रवाह वाहिनीने चाहत्यांना खास सरप्राइज दिले आहे. ज्याची एक झलक त्यांनी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची आवडती जोडी कॉमेडी किंग निलेश साबळे (Nilesh Sable) आणि भाऊ कदम (Bhau Kadam ) पुन्हा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनी एकामागोमाग एक नवीन मालिका सुरू करत आहे. सर्वात आधी 'लपंडाव' त्यानंतर 'नशीबवान' मालिका सुरू झाली. काही दिवसांपूर्वी 'काजळमाया' मालिकेची घोषणा करण्यात आली आहे.

आता स्टार प्रवाह वाहिनीवर खास दिवाळी निमित्त नवीन शो सुरू होत आहे. ज्याचे नाव ढिंचॅक दिवाळी असे आहे. हा शो रविवार 12 ऑक्टोबर संध्याकाळी 7:00 वाजता पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये 'चला हवा येऊ द्या'चे स्टार निलेश साबळे आणि भाऊ कदम झळकणार आहे. या जोडीने आजवर प्रेक्षकांना खळखळवून हसवले आहे. चाहते नवीन शोसाठी खूपच उत्सुक आहेत.

नवीन शोच्या प्रोमोला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "ऐतिहाsहाsहाsसिक... ढिंचॅक दिवाळी...मिळणार बोनस मनोरंजनाचा..." नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा, कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रोमोमध्ये भाऊ कदम आणि निलेश साबळे शिपाई आणि प्रधानांच्या भूमिकेत दिसत आहे. राज महालाचा सेट पाहायला मिळत आहे.

नवीन मालिका 'काजळमाया'

'स्टार प्रवाह'वर सुरू होणारी 'काजळमाया' मालिका हॉरर आहे. मालिकेत मराठमोळा अभिनेता अक्षय केळकर झळकणार आहे. अक्षय केळकर हा 'बिग बॉस 4' चा विजेता राहिला आहे.

Nilesh Sable-Bhau Kadam Diwali Special Show
'Bigg Boss 19'च्या घरात तान्या मित्तल झाली राजकुमारी; अमाल मलिकने स्वतःच्या हातांनी जेवण भरवले, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com