खोबरं काढणं आता सोप्पं! साऊथस्टाईल १ सोपी टीप; सेकंदात फुटेल नारळ

How to Break Coconut Without Struggle: नारळ फोडण्यासाठी सोपी युक्ती. शेफ कुणाल कपूर यांनी दिली खास टीप. काही सेकंदात नारळ फुटेल.
How to Break Coconut Without Struggle
How to Break Coconut Without StruggleSaam
Published On

नारळ शरीरासाठी अत्यंत गुणकारी. नारळ पाणी प्यायल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात. नारळ पाणी प्यायल्यानं शरीराला उर्जा मिळते. नारळ पाणी इलेक्ट्रोलाइट्सचा प्रमुख स्त्रोत आहे. नारळ पाणीसह खोबरं देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. खोबरं खाल्ल्याने वेट लॉससाठी मदत होते. तसेच पचन सुधारण्यास, शरीर हायड्रेटेड ठेवण्यास, आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. मात्र, कडक नारळ फोडताना त्रास होतो. नारळ फोडताना हाताला इजा होण्याची शक्यता आहे. पण नारळ फोडण्यासाठी आपण प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केलेलं टीप फॉलो करून पाहू शकता.

प्रसिद्ध शेफ कुणाल यांनी नारळ फोडण्यासाठी एक विशेष टीप शेअर केली आहे. त्यांनी इन्स्टाग्राम व्हिडिओवरून ही युक्ती शेअर केली आहे. या युक्तीमुळे नारळ क्षणात फुटेल. तसेच कवचातून खोबरंही सहज आणि लवकर निघेल. नारळ फोडण्यासाठी आपण लाटण्याची मदत घेऊ शकता. नारळावर रेषा असतात. या रेषांवर जोरात मारल्याने नारळ लवकर तुटेल. नारळावरील रेषांवर तीन - चारवेळा मारल्याने नारळ लवकर फुटेल. या सिंपल ट्रिकमुळे नारळ लवकर फुटेल.

How to Break Coconut Without Struggle
धक्कादायक! साताऱ्यातील महिला डॉक्टरनं आयुष्याचा दोर कापला; हॉटेलमधील खोलीत आढळला मृतदेह

चाकूच्या मदतीने आपण कवचातून खोबरं काढू शकता. किंवा चमच्याच्या मदतीनेही आपण कवचातून खोबरं काढू शकता. कवचातून खोबरं काढण्यासाठी सर्वात आधी नारळ गॅसवर ठेवा. ३० ते ३५ सेकंद नारळ गॅसवर ठेवा. नंतर गॅस बंद करा आणि नारळ एका कापडावर ठेवा. कापडाने नारळ पकडा आणि कवचातून खोबरं बाहेर काढा. खोबरं लवकर आणि सहज निघेल.

How to Break Coconut Without Struggle
'विरोधी पक्षातील नेते अन् पत्रकारांच्या फोनवर नजर''; ठाकरे गटाच्या खासदाराकडून बावनकुळेंच्या अटकेची मागणी

आपण कवचातून खोबरं काढण्यासाठी गरम किंवा कोमट पाण्याचाही वापर करू शकता. गरम पाण्यात नारळ ठेवा. ५ ते १० मिनिटे नारळ ठेवा. नंतर चाकूने कवचातून खोबरं बाहेर काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com