Shreya Maskar
दूध हे पोषक तत्वांचा खजिना आहे. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, बी1, पोटॅशियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे नियमित एक ग्लास नक्की दूध प्या. यामुळे शरीरात ताकद येते.
दूध नीट ठेवले नाही किंवा काळजीपूर्वक उकळवले नाही तर ते फाटते. काही लोक फाटलेले दूध फेकून देतात. जे चुकीचे आहे. फाटलेले दूध देखील खूप फायदेशीर ठरते. त्याचा वापर कसा करावा, जाणून घेऊयात.
फाटलेल्या दुधापासून घरगुती दही बनवा. फाटलेले दूध गरम करून त्यात लिंबाचा रस टाकून ५-६ तास ठेवून द्या. अशाप्रकारे घरगुती दही तयार झाले. चपाती, भातासोबत याचा आस्वाद घ्या.
फाटलेल्या दुधापासून तुम्ही झटपट ताक बनवू शकता. ताकात मीठ, भाजलेले जिरे आणि पुदिना घालून प्या. हे पेय पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानले जाते. तसेच कढीमध्ये हे टाकल्यास कढीची चव आणखी वाढते.
बेसनचे पकोडे, चिल्ला किंवा कचोरी बनवत असाल तर पीठ मळताना पाण्याऐवजी ताक वापरा. यामुळे मिश्रण मऊ होते आणि त्याला थोडीशी आंबट चव येते.
बेसन , मुलतानी मातीमध्ये ताक मिसळून फेस पॅक बनवा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. दुधातील पोषक घटक चेहरा मऊ आणि मुलायम करतात.
फाटलेले दूध तुम्ही बेकिंगसाठी वापरू शकता. केक, पॅनकेक्स किंवा मफिन्स बनवताना दह्याऐवजी फाटलेल्या दुधाचा वापर केल्यास पदार्थ मऊ होतो. तसेच चव देखील वाढते.
फाटलेले दूध हे झाडांसाठी उत्तम खत आहे. फाटलेले दूध पाण्यात मिसळून झाडांना, घरातील रोपांना घाला यामुळे झाडांना पोषण मिळेल आणि ते चांगले वाढतील.