Flower Face Pack : गुलाबासारखा कोमल दिसेल तुमचा चेहरा, फुलांच्या फेस पॅकने घरबसल्या मिळवा चमकदार त्वचा

Shreya Maskar

गुलाब

गुलाब फक्त दिसायलाच सुंदर नसतात, तर ते आपल्या त्वचेवर जादूसारखे काम करतात. गुलाबमुळे त्वचेला मऊ, मुलायम आणि कोमल होते.

Flower Face Pack | yandex

गुलाबाच्या पाकळ्या

मिक्सरला गुलाबाच्या पाकळ्या बारीक करा त्यात गुलाब पाणी, तांदळाचे पीठ टाकून फेस पॅक तयार करा. तुम्ही यात थोडं बेसन देखील टाकू शकता.

Flower Face Pack | yandex

फेस पॅक

गुलाबाच्या पाकळ्यांचा फेस पॅक 15-20 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून त्याला मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा कोरडी होत नाही.

Flower Face Pack | yandex

त्वचा हायड्रेट करा

गुलाबपाणी त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते, ज्यामुळे त्वचा कोमल राहते. हायड्रेट राहते. तसेच जर चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स असतील तर हा स्वस्तात मस्त घरगुती उपाय आहे.

Flower Face Pack | yandex

नॅचरल टोनर

त्वचेवरील उघडी छिद्रे (Pores) घट्ट करण्यास गुलाब मदत करते. तसेच त्वचेचा pH समतोल राखण्यास मदत करते. यामुळे चेहरा दिवसेंदिवस अधिक ग्लो करतो.

Flower Face Pack | yandex

दाहक-विरोधी गुणधर्म

त्वचेची जळजळ, लालसरपणा आणि पुरळ कमी करण्यासाठी गुलाबपाणी अत्यंत प्रभावी आहे. यामुळे त्वचेला झालेला संसर्ग कमी होतो. तसेच तुम्हाला आराम मिळतो.

Flower Face Pack | yandex

तेलकट त्वचा

गुलाबाचा फेस पॅक त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकते आणि त्वचेला स्वच्छ करते. त्यामुळे ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी आवर्जून याचा वापर करावा.

Flower Face Pack | yandex

सुरकुत्या कमी होतात

गुलाबातील अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढतात, ज्यामुळे अकाली वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होऊन त्वचा तरूण दिसते.

Flower Face Pack | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Skin Care | yandex

NEXT : मुंबई, पुणे नव्हे तर 'हे' आहे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन, पाय दुखतील पण प्लॅटफॉर्म संपणार नाही

Railway Station | yandex
येथे क्लिक करा...