Jolly LLB 3 Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Jolly LLB 3 Shooting Start : खरा जॉली कोण? अक्षय कुमार की अरशद वारसी; ‘जॉली एलएलबी ३’ च्या कथेत नवा ट्वीस्ट, शूटिंगला सुरुवात

Jolly LLB 3 Shooting Started : बहुप्रतिक्षित अक्षय कुमार आणि अरशद वारसीच्या ‘जॉली एलएलबी ३’ची घोषणा करण्यात आली असून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे.

Chetan Bodke

Jolly LLB 3 Announcement

‘जॉली एलएलबी’च्या सिक्वेलसला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता ‘जॉली एलएलबी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसीने इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केलेला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी चित्रपटाच्या शुटिंगबद्दल माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता होती. अखेर चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झालेली आहे.

‘जॉली एलएलबी ३’चा शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, अर्शद आणि अक्षय दोघेही खरा जॉली कोण? आणि खोटा जॉली कोण ? यावर एकत्र भांडताना दिसत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या भागातले वकील आता तिसऱ्या भागात आपल्याला एकत्र दिसणार आहे. प्रोमोमध्ये, दोघेही स्वत:ला खला जॉली तर दुसरा खोटा वकील असल्याचा ठामपणे दावा करीत आहे. चित्रपटाच्या शुटिंगला अजमेरमध्ये सुरूवात झालेली आहे. प्रोमोच्या शेवटच्या भागामध्ये, सौरभ शुक्लाही दिसत आहे. 'जॉली एल. एल. बी. ३ च्या शूटिंगला सुरुवात' असं त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले आहे. (Bollywood Actor)

अक्षयने व्हिडीओला कॅप्शन दिले की, "आता ओरिजिनल कोण आणि डुप्लिकेट कोण हे तर माहीत नाही, पण आता हा प्रवास नक्कीच जॉली होणार आहे हे नक्की. आमच्यासोबत राहा, जय महाकाल!" दरम्यान, चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. पण आता प्रेक्षकांना खरा जॉली अक्षय कुमार की अरशद वारसी? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे. (Bollywood Film)

सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी’ २०१३ मध्ये रिलीज झाला होता. तर ‘जॉली एलएलबी २’ २०१७ मध्ये रिलीज झाला होता. आता ‘जॉली एलएलबी ३’ केव्हा रिलीज होणार अद्याप अस्पष्ट आहे. प्रेक्षक आता ‘जॉली एलएलबी ३’ साठी उत्सुक आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT