Harry Potter Castle Viral Video : रशियाच्या हल्ल्यात हॅरी पॉटरचा राजवाडा जळून खाक, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर
Harry Potter Castle Viral Video
बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेला रशिया- युक्रेन संघर्ष थांबवण्याचं नाव घेत नाहीये. रशियानं पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक इमारतींचे आणि वास्तूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे हॅरी पॉटरचे कॅसल (Harry Potter Castle) होय. अशातच सध्या सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (Viral Video)
युक्रेनने या हल्ल्याबाबत सांगितले असून रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुले आणि एका गरोदर महिलेचा समावेश आहे. जखमींमध्ये काही लोकांची परिस्थितीही चिंताजनक असल्याचे कळत आहे. खरंतर 'हॅरी पॉटरचा राजवाडा' म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या ह्या ठिकाणी हॅरी पॉटरच्या चित्रपटांची बरीचशी शुटिंग इथेच झालेली आहे. इथे एक शैक्षणिक संस्थाही आहे. (Hollywood)
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हल्ल्याची भीषणता पाहायला मिळत आहे. कशाप्रकारे या अग्निशमन दलाचे कामगार ही आग आटोक्यात आणत आहे, हे पाहायला मिळत आहे. मिसाईल हल्ल्यानंतर या राजवाड्याचा मोठा भाग उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. लाल समुद्राच्या किनाऱ्यावरच हा हॅरी पॉटरचा राजवाडा आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.