Naach Ga Ghuma Collection : 'नाच गं घुमा'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; दोन दिवसांतच जमावला कोट्यवधींचा गल्ला

Naach Ga Ghuma Box Office Collection : परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांतच कोट्यवधींची कमाई केलेली आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल....
Naach Ga Ghuma Box Office Collection
Naach Ga Ghuma Box Office CollectionInstagram

Naach Ga Ghuma Day 2 Box Office Collection

‘बाईपण भारी देवा’ आणि ‘झिम्मा २’ नंतर १ मेला ‘नाच गं घुमा’ हा स्त्रीप्रधान चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाचे सध्या प्रेक्षकांकडून जोरदार कौतुक केले जात आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांतच कोट्यवधींची कमाई केलेली आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल....

Naach Ga Ghuma Box Office Collection
Aditi And Siddharth Engagement : अदिती-सिद्धार्थने ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा का केला?, अभिनेत्रीने एका महिन्यानंतर केला खुलासा...

‘नाच गं घुमा’ हा चित्रपट बुधवारी १ मे रोजी अर्थात ‘महाराष्ट्र दिनी’ प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी २.१५ कोटींची कमाई तर दुसऱ्या दिवशी ८५ लाखांची कमाई केलेली आहे. एकूण दोन दिवसांत चित्रपटाने ३ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केलेली आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये चित्रपटाचा समावेश झाला असून विकेंडला चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

चित्रपटाच्या कमाईचा आकडा सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने त्यांच्या वेबसाईटवर शेअर केलेली आहे. चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि स्वप्नील जोशी यांनी केली आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशीने चित्रपटाच्या कथानकाचं लेखन केलं आहे, तर परेश मोकाशीने चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

Naach Ga Ghuma Box Office Collection
Bobby Deol: सुलतान बनत बॉबी देओलने दाखवला दम; 'हरि हर वीरा मल्लू' चा टीझर रिलीज

चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत नम्रता संभेराव, मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर आणि बालकलाकार मायरा वायकुळ आहे. चित्रपटाच्या कथेत जॉब करणारी महिला आणि मोलकरीण यांच्यातील नाते दाखवले आहे. कौटुंबिक, भावनिक आणि कॉमेडी या जॉनरचा हा चित्रपट असून ही प्रत्येक कुटुंबातील गोष्ट आहे.

Naach Ga Ghuma Box Office Collection
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेविषयी पसरल्या होत्या 'या' अफवा, शेवटी तथ्य समोर आलंच!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com