Aditi And Siddharth Engagement : अदिती-सिद्धार्थने ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा का केला?, अभिनेत्रीने एका महिन्यानंतर केला खुलासा...

Aditi Hydari And Siddharth Engagement : अभिनेत्री आदिती हैदरी हिने तेलंगणामधील सुमारे ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा का केला ? याबद्दलचा खुलासा तिने एका महिन्यानंतर केला आहे.
Aditi Hydari And Siddharth Engagement
Aditi Hydari And Siddharth EngagementSaam Tv

Aditi Hydari And Siddharth Engagement In 400 Year Old Temple

सध्या अभिनेत्री आदिती राव हैदरी संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी : द डायमंड बाझार’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. तिची ही वेबसीरीज १ मे ला ‘नेटफ्लिक्स’ ओटीटीवर रिलीज झाली आहे. आदितीने आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थने २८ मार्चला गुपचूप साखरपुडा आटोपला.

गेल्या अनेक दिवसांपासून या कपलच्या रिलेशनची जोरदार चर्चा होत आहे. सध्या आदिती वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच आदितीने 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिलेली आहे. मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तेलंगणामधील सुमारे ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा का केला ?, याबद्दलचा खुलासा तिने केला आहे.

Aditi Hydari And Siddharth Engagement
Bobby Deol: सुलतान बनत बॉबी देओलने दाखवला दम; 'हरि हर वीरा मल्लू' चा टीझर रिलीज

मुलाखतीमध्ये आदिती म्हणाली, “मला माझ्या कुटुंबासोबत ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा करायचा होता. मी आणि सिद्धार्थने साखरपुडा गुपचूप केला होता. आमच्या साखरपुड्याला दोघांचाही मित्रपरिवार आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. आमचे लग्न झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. आमच्या लग्नाच्या अफवा इतक्या पसरल्या होत्या की, माझ्या आईला लग्नाविषयी विचारण्यासाठी नातेवाईकांचे फोन येत होते. त्यावेळी मला आई म्हणाली, प्लीज लोकांना आता तरी सांगू टाक, कारण मला खूप फोन येत आहे. मग शेवटी आम्ही सोशल मीडियावर फोटो शेअर करत साखरपुड्याबद्दल सांगून दिले.” (Bollywood News)

२८ मार्च २०२४ ला अदिती आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नाच्या अफवा धुडकावत एंगेजमेंटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरममध्ये सिद्धार्थ-अदितीचा साखरपुडा पार पडला. शेअर केलेल्या फोटोमध्ये, सिद्धार्थ आणि आदिती एंगेजमेंट रिंग फ्लाँट करताना दिसले. दोघांच्या क्लोज सेल्फीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. (Entertainment News)

Aditi Hydari And Siddharth Engagement
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेविषयी पसरल्या होत्या 'या' अफवा, शेवटी तथ्य समोर आलंच!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com