Bobby Deol: सुलतान बनत बॉबी देओलने दाखवला दम; 'हरि हर वीरा मल्लू' चा टीझर रिलीज

Hari Hara Veera Mallu Hindi Teaser : बॉबी देओल आणि पवन कल्याण याचा 'हरी हर वीरा मल्लू' या चित्रपटाचा हिंदी टीझर रिलीज झाला आहे.
Hari Hara Veera Mallu Hindi Teaser Bobby Deol Sultan
Hari Hara Veera Mallu Hindi Teaser Bobby Deol Sultanyou tube

Hari Hara Veera Mallu Hindi Teaser Bobby Deol Sultan :

पवन कल्याण पहिल्यांदाच पीरियड ॲक्शन अ‍ॅडव्हेंचर सिनेमा करत आहेत. या सिनेमात अ‍ॅनिमलमधील अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा बॉबी देओल देखील दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव ' हरी हरा वीरा मल्लू' असून या सिनेमाचा हिंदी टीझर रिलीज झालाय. चित्रपटाचे चित्रीकरण मोठ्या बजेटमध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटात बॉबी देओल दिल्लीच्या सुलतानच्या भूमिकेत दिसणार आहे.

निर्मात्यांनी टीझरमध्ये पवन कल्याण उर्फ ​​हरी हरा वीरा मल्लूच्या व्यक्तिरेखेचे ​​वर्णन 'एक योद्धा' म्हणून केलंय. हा युद्धा गरीब शोषितांच्या न्यायासाठी लढतो'. दरम्यान या चित्रपटातील संगीत एमएम कीरावानी यांनी दिलंय. पवन कल्याण आणि बॉबी देओल या दोन्ही स्टार्सचा अभियन दमदार दिसत आहे. दोघांची देहबोली त्यांच्या व्यक्तीरेखेला साजेशी आहे.

हरि हर वीरा मल्लू या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक क्रिश जगरलामुडी यांनी केलंय. त्यांनी याआधीच कांचे, गौतमीपुत्र सातकर्णी आणि मणिकर्णिका यांसारखे ब्लॉकबस्टर सिनेमांचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात पवन कल्याणसह निधी अग्रवाल, बॉबी देओल, सुनील, नोरा फतेही आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०२४ च्या अखेरीस प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केलंय.

Hari Hara Veera Mallu Hindi Teaser Bobby Deol Sultan
Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com