Ankita Lokhande : अंकिता लोखंडेविषयी पसरल्या होत्या 'या' अफवा, शेवटी तथ्य समोर आलंच!

Ankita Lokhande Rejects Karan Johar's New Project : बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’नंतर चांगलीच प्रकाशझोतात आली आहे.
Ankita Lokhande News
Ankita Lokhande NewsSaam TV

Ankita Lokhande Rejects Karan Johar's Web Series Student of The Year 3

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’नंतर चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटानंतर अभिनेत्री लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकिता लोखंडे करण जोहरच्या अपकमिंग प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु होती. पण अंकिताला करण जोहरच्या ‘स्टुडेंट ऑफ द इयर ३’ या वेबसीरीजची ऑफर देण्यात आली होती, पण तिने ती ऑफर नाकारल्याचे वृत्त आहे.

Ankita Lokhande News
Uma Ramanan Dies : तामिळ सिनेसृष्टीतला आवाज काळाच्या पडद्याआड, दिग्गज गायिकेचे निधन

न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्टुडेंट ऑफ द इयर ३’ची ऑफर अंकिता लोखंडेला मिळाली होती. पण अभिनेत्रीने त्या वेबसीरीजची ऑफर नाकारली आहे. याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, " निर्मात्यांनी ‘स्टुडेंट ऑफ द इयर ३’साठी अंकितासोबत संपर्क साधला होता. पण त्यांनी कोणत्या भूमिकेसाठी तिला ऑफर दिली होती, हे ही गुलदस्त्यात आहे." सध्या सोशल मीडियावर अंकिता ‘स्टुडेंट ऑफ द इयर ३’मध्ये दिसणार आहे, अशी चर्चा होत आहे.

‘स्टुडेंट ऑफ द इयर’च्या पहिल्या भागात आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुन धवन मुख्य भूमिकेत होते. तिघांनीही या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. दुसऱ्या भागामध्ये टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत होते.

२०१९ मध्ये ‘स्टुडेंट ऑफ द इयर २’ रिलीज झाला होता. यावेळी ‘स्टुडेंट ऑफ द इयर ३’ चित्रपट नसून वेबसीरीज असणार आहे. वेबसीरीजचे दिग्दर्शन रीमा मायाने करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संजय कपूरची मुलगी शनाया कपूर, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. पण, अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Ankita Lokhande News
Anuj Thapar News : "अनुज थापरची आत्महत्या नाही तर हत्या...", कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com