Freedom At Midnight Cast Unveiled : निखिल अडवाणी यांच्या 'फ्रिडम ॲट मिडनाइट'चा फर्स्ट लूक आऊट; गांधी- नेहरू आणि पटेल यांच्या भूमिकेत कोण दिसणार ?

Freedom At Midnight : निखिल अडवाणी दिग्दर्शित 'फ्रिडम ॲट मिडनाइट' वेबसीरीजची नुकतीच घोषणा करण्यात आली असून फर्स्ट लूक शेअर करण्यात आलेला आहे.
Freedom At Midnight Cast Unveiled
Freedom At Midnight Cast UnveiledInstagram

Freedom At Midnight Cast Unveiled

सध्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होत आहेत. त्या कलाकृतींची चाहत्यांमध्ये, कायमच जोरदार चर्चा होताना दिसते. अशातच नुकताच सोशल मीडियावर 'फ्रीडम ॲट मिडनाईट' (Freedom At Midnight) नावाची वेबसीरीज 'सोनी लिव्ह' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. वेबसीरीजची सोशल मीडियावर नुकतीच घोषणा करण्यात आली असून वेब सीरिजमधील काही कलाकारांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. (Web Series)

Freedom At Midnight Cast Unveiled
Harry Potter Castle Viral Video : रशियाच्या हल्ल्यात हॅरी पॉटरचा राजवाडा जळून खाक, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर

या वेबसीरीजचे दिग्दर्शन निखिल अडवाणी करीत असून त्यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर वेबसीरीजमधील कलाकारांचा फर्स्ट लूक शेअर केलेला आहे. यामध्ये स्वर्गीय पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्या लूकमध्ये तीन कलाकार दिसत आहे. (OTT)

'फ्रिडम ॲट मिडनाईट' वेबसीरिजमध्ये चिराग वोहरा महात्मा गांधी यांच्या भूमिकेत, सिद्धांत गुप्ता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेत तर राजेंद्र चावला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत दिसत आहेत. तिघांच्याही लूकची सध्या नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू असून लूकचे कौतुक केले जात आहे. या वेबसीरीजसाठी चाहते उत्सुक आहेत. (Bollywood)

निखिल अडवाणी यांनी वेडा, ड्राय डे चित्रपटाचे आणि मुंबई डायरी सारख्या वेबसीरीजचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. 'फ्रिडम ॲट मिडनाईट' वेब सीरीजचे कथानक लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांनी लिहिलेल्या 'फ्रिडम ॲट मिडनाईट' नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. ही सीरिज लवकरच Sony Liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. (Entertainment News)

Freedom At Midnight Cast Unveiled
Naach Ga Ghuma Collection : 'नाच गं घुमा'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; दोन दिवसांतच जमावला कोट्यवधींचा गल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com