Arshad Warsi And Sanjay Datt Photo: मुन्नाभाई- सर्किट पुन्हा एकदा एकत्र दिसणार; अर्शद- संजयसोबतच्या सेल्फीमागचं नेमकं रहस्य काय?

Arshad Warsi And Sanjay Datt Meet: ‘मुन्नाभाई’ च्या सिक्वेलची तुफान चर्चा सुरू होत असताना अभिनेता संजय दत्त व अर्शद वारसी ‘मुन्नाभाई ३’साठी एकत्र भेटल्याचं बोललं जात आहे.
Arshad Warsi And Sanjay Datt Photo
Arshad Warsi And Sanjay Datt PhotoInstagram

Munnabhai 3 Latest Update: प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे मुन्नाभाई आणि सर्किट हे दोन पात्र तुम्हाला नक्कीच आठवत असतील. या दोघांनीही चित्रपटात प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरून धरून हसवलं. मध्यंतरी प्रेक्षकांच्या भेटीला ‘मुन्नाभाई ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी चर्चा सुरू होती. पण खुद्द कलाकारांनीच त्यावर पडदा टाकून चर्चेला पूर्णविराम दिला होता. अशातच चित्रपटाच्या सिक्वेलची तुफान चर्चा सुरू असताना अभिनेता संजय दत्त व अर्शद वारसी ‘मुन्नाभाई ३’ साठी एकत्र भेटल्याचं बोललं जात आहे. सध्या त्यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Arshad Warsi And Sanjay Datt Photo
Akash Choudhary Accident: टेलिव्हिजन अभिनेत्याला आला विकेंड ट्रीपचा धक्कादायक अनुभव; स्वत:च सांगितला मन सुन्न करणारा अपघाताचा खुलासा

संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्या भेटीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोत संजय दत्तने अर्शद वारसी यांच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसून येत आहे. सध्या त्यांच्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रेक्षकांना ‘मुन्नाभाई ३’ची चांगलीच उत्सुकता लागली. पण हे दोघेही चित्रपटासाठी भेटले नसून एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी त्यांची भेट झाल्याची माहिती मिळाली आहे.

Arshad Warsi And Sanjay Datt Photo
Bigg Boss OTT 2 Weekend Ka Vaar : सलमान खानच्या अनुपस्थित पहिलाच बिग बॉस; कसा होता यंदाचा ‘वीकेंड का वार’? जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अर्शद वारसी म्हणालेला, “आमच्याकडे चित्रपटासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टी आहे, पण हा चित्रपट बनेल मला असं वाटत नाही. आमच्याकडे दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, प्रेक्षक आहेत आणि कलाकार देखील आहेत. आणि तरीही चित्रपट होऊ शकत नाही, याचं मला खूप विचित्र वाटतंय.”

चित्रपटाचं शूटिंग का पुढे ढकलली जात आहे, याबद्दल अर्शद वारसी म्हणतो, “चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून मिळालेल्या यशानंतर प्रेक्षकांना ‘मुन्नाभाई ३’ चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना प्रेक्षकांच्या मागणीप्रमाणेच चित्रपट करायचा आहे. या कारणामुळे चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी जास्त वेळ लागत आहे.”

Arshad Warsi And Sanjay Datt Photo
Jar Tar Chi Goshta: प्रिया- उमेश सांगणार ‘जर तर ची गोष्ट’; एका दशकानंतर दिसणार ‘क्यूट कपल’

तर मुलाखतीच्या शेवटच्या भागात अर्शद वारसी म्हणतो, “चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना आपल्या चित्रपटात सर्वच गोष्टी व्यवस्थित हव्या असतात. त्यांच्याकडे सध्या तरी, ३ चांगल्या स्टोरी आहेत. पण, त्यातही काही प्रमाणात चुका आहेत. त्यामुळे जोपर्यंत दिग्दर्शकांना त्या चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल पूर्णपणे खात्री होत नाही, तोपर्यंत ते काम चालू करणार नाहीत.”

“आपण त्यांना काही विचारलं तर ते नेहमीच हो म्हणतात. कारण दिग्दर्शक कधीच कोणत्या गोष्टीला नाही बोलत नाही. दिग्दर्शक राजकुमार हिरानी चित्रपटाबद्दल नेहमीच सांगतात, ‘मी सध्या चित्रपटावर काम करतोय, एकदाची स्क्रिप्ट कन्फॉर्म होऊ द्या. मला या स्क्रिप्टमधलं हे आवडतं नाही, मला त्या स्क्रिप्टमधलं ते आवडतं नाही.’ त्यांनी फक्त हा टप्पा पार करायला हवा, मग ते या चित्रपटाला नक्की सुरुवात करतील,” असं अर्शद स्पष्टच सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com