'जॉली एलएलबी 3' चित्रपट 19 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलीज झाला.
चित्रपटाने सहा दिवसांत चित्रपटाने 69 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
'जॉली एलएलबी 3' चित्रपटाने अक्षय कुमारच्या दोन चित्रपटांना मागे टाकले आहे.
अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसीच्या 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) चित्रपटाने सहाव्या दिवशी देखील तुफान कमाई केली आहे. 'जॉली एलएलबी 3'ने अक्षय कुमारच्याच दोन चित्रपटांना मागे टाकले आहे. 'जॉली एलएलबी 3' चित्रपट 19 सप्टेंबरला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. सहा दिवसांत चित्रपटाने 69 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपट लवकरच 100 कोटी पार करेल. 'जॉली एलएलबी 3'चे सहाव्या दिवसाचे कलेक्शन जाणूवन घेऊयात.
पहिला दिवस - 12.5 कोटी रुपये
दुसरा दिवस - 20 कोटी रुपये
तिसरा दिवस - 21 कोटी रुपये
चौथा दिवस - 5.5 कोटी रुपये
पाचवा दिवस - 6.50 कोटी रुपये
सहावा दिवस - 4.25 कोटी रुपये
एकूण - 69.75 कोटी रुपये
'जॉली एलएलबी 3' ने आतापर्यंत सहा दिवसांत चित्रपटाने 69 कोटींच्यावर कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत राहिली तर चित्रपट या आठवड्याच्या शेवटी 100 कोटींचा टप्पा पार करेल. भारतात 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्यासाठी 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाला अजूनही 30 कोटींची कमाई करावी लागेल.
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाने अक्षय कुमारच्या दोन चित्रपटांना मागे टाकले आहे. यात 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'राम सेतु' यांचा समावेश आहे. दोन्ही चित्रपट 2022ला रिलीज झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाची जगभरात कमाई 90.74 कोटी रुपये झाली. तर 'जॉली एलएलबी 3'ने जगभरात 101.50 कोटींच्यावर कमाई केली आहे. तसेच 'राम सेतु' जगभरात अंदाजे 92.94 कोटी कमावले. चित्रपटाचे देशांतर्गत कलेक्शन सुमारे 85.56 कोटी रुपये इतके होते.
'जॉली एलएलबी 3' हा जॉली एलएलबी फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे.'जॉली एलएलबी ' 2013 मध्ये आणि 'जॉली एलएलबी 2 ' चित्रपट 2017 ला रिलीज झाला. या दोन्ही चित्रपटांना देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 'जॉली एलएलबी 3'मध्ये अक्षय कुमार, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी आणि अमृता राव हे कलाकार झळकले आहेत. सुभाष कपूर दिग्दर्शित 'जॉली एलएलबी 3' कोर्टरूम ड्रामा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.