Viral Love Story : प्यार का चक्कर बाबू भैया! महिला बॉस प्रेमात आकंठ बुडाली, कर्मचारी बॉयफ्रेंडसाठी मोजले ३.७३ कोटी!

Zoo And He Love story : चीनमधील ‘झू’ नावाच्या लेडी बॉसने प्रेमात पडलेल्या कर्मचाऱ्याला ३.७३ कोटी रुपये दिले. घटस्फोटानंतर वाद निर्माण झाला आणि झू ने न्यायालयात पैसे परत मागितले मात्र कोर्टाचा निर्णय कर्मचाऱ्याच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे झू हिला ही रक्कम परत मिळू शकणार नाही.
Viral Love Story : लेडी बॉसचं प्रेम ३.७३ कोटींचं! कर्मचाऱ्यातच जीव गुंतला; घटस्फोट घडवला, आता स्वतःच चढली कोर्टाची पायरी
Viral Love Story Saam Tv
Published On
Summary
  • चीनमधील लेडी बॉसने कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडून ३.७३ कोटी दिले.

  • लेडी बॉसने घटस्फोट घडवून आणल्यावर पैसे परत मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली.

  • सुरुवातीला न्यायालयाने लेडी बॉसला दिलासा दिला.

  • शेवटी कर्मचाऱ्याच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला.

प्रेमासाठी काहीपण करणाऱ्या तरुण तरुणींचे किस्से वाचत आलो आहोत, पाहत आलो आहोत. मात्र एका लेडी बॉसने प्रेम करण्याची हद्दच पार केली आहे. कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाच्या प्रेमात पडलेल्या लेडी बॉसने चक्क त्याचा घटस्फोट घडवून आणला आहे. धक्कादायक म्हणजे या लेडी बॉसने पत्नीपासून वेगळं होण्यासाठी तरुणाला ₹3.73 कोटी दिले आहे. मात्र एकत्र आल्यानंतर लेडी बॉस आणि तरुणामध्ये भांडण झाल्याने पैसे परत मागण्यासाठी तिने न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र तिच्या पदरी नैराश्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चीनमधील 'झू' नावाची एक महिला चोंगकिंगमध्ये एक कंपनी चालवत होती. तिच्या कंपनीत 'हे' नावाचा एक तरुण काम करत होता आणि झू त्याच्याकडे आकर्षित झाली. धक्कदायक म्हणजे हे दोघही विवाहबंधनात होते. झू आणि हे यांनी एकमेकांच्या जोडीदाराला घटस्फोट दिला. झू हिने हे च्या बायकोला पोटगी देण्यासाठी ₹3.73 कोटी दिले.

Viral Love Story : लेडी बॉसचं प्रेम ३.७३ कोटींचं! कर्मचाऱ्यातच जीव गुंतला; घटस्फोट घडवला, आता स्वतःच चढली कोर्टाची पायरी
Mumbra Railway Station : 'मुंब्रा' स्टेशनचे नाव अज्ञाताने अचानक बदलले, स्टेशनच्या फलकावर लावले दुसरे नाव

बरेच दिवस झू आणि हे यांच्या नात्यात आलबेल सुरु होते. मात्र काही महिन्यांनंतर झू आणि हे यांच्या नात्यात ताण निर्माण झाला. सततचे वाद होत होते. त्यामुळे या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. झू आणि हे चा घटस्फोट झाल्यानंतर झू ने हे ला दिलेली ₹3.73 कोटी रक्कम परत मागितली. मात्र हे ने ते देण्यास नकार दिल्याने झू ने न्यायालयात धाव घेतली.

Viral Love Story : लेडी बॉसचं प्रेम ३.७३ कोटींचं! कर्मचाऱ्यातच जीव गुंतला; घटस्फोट घडवला, आता स्वतःच चढली कोर्टाची पायरी
Shocking : पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा घात झाला; आमदारी पॉईंटवरून पडून मृत्यू

न्यायालयाने सुरुवातीच्या सुनावणीत झू चेन हिच्या बाजूने दिलासा दायक निर्णय दिला. मात्र दुसऱ्या सुनावणीत पुराव्यांच्या अभव्यामुळे न्यायालयाने हे याला पैसे देण्याच्या वादातून मुक्त केले आहे. हा निकाल हे याच्या बाजूने लागला आहे. दरम्यान या प्रेम प्रकरणाची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com