Crime : लग्नासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या, कोळशात जाळलं अन् मृतदेह नाल्यात फेकला

Crime News : भारतीय वंशाची अमेरिकन महिला लग्न करण्यासाठी पंजाबला आली होती. आरोपीने तिची हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह जाळण्यात आला. पैशासाठी महिलेची हत्या झाल्याचे म्हटले जात आहे.
crime
crimex
Published On
Summary
  • पंजाबमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेची हत्या उघडकीस.

  • लग्नासाठी आलेल्या एनआरआय महिलेला पैशासाठी ठार मारलं.

  • आरोपींनी मृतदेह जाळल्याची कबुली दिली, मुख्य आरोपी फरार.

Shocking : भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडली आहे. आरोपीने महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह जाळल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला सिएटलहून यूकेतील एका एनआरआय पुरुषाशी लग्न करण्यासाठी पंजाबला आली होती. जेव्हा लुधियाना पोलिसांनी महिलेच्या बेपत्ता होण्याबाबत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये संशयितांची नावे दिली तेव्हा जुलैमध्ये घडलेली ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपिंदर कौर पंढेर या अमेरिकेत राहणारी एनआरआय ७१ वर्षीय महिला ७५ वर्षीय चरणजीत सिंह ग्रेवाल यांच्या निमंत्रणावर भारतात आल्या होत्या. रुपिंदर या चरणजीत सिंह यांच्याशी लग्न करण्यासाठी पंजाबला आल्या होत्या. त्याची हत्या चरणजीत सिंह ग्रेवाल यांनीच केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

crime
Voter List : मतदार यादीमध्ये मोठा घोटाळा, एकाच घरात तब्बल ४,२७१ मतदार

२४ जुलै रोजी रुपिंदर कौर यांची बहीण कमल कौर खैराद त्यांना फोन करत होत्या. फोन सतत बंद असल्याचे दिसून आल्याने कमल कौर यांना शंका आली. २८ जुलै रोजी त्यांनी नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाला कळवले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी रुपिंदर कौर यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मागच्या आठवड्यात रुपिंदर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

crime
Singer Death : कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन

एनआरआय रुपिंदर कौर पंढेर यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी मल्हा पट्टी येथील रहिवासी सुखजीत सिंह सोनू या व्यक्तीला अटक केली आहे. सोनूने रुपिंदर यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह स्टोअररुममध्ये जाळल्याची कबुली दिली असे पोलिसांनी म्हटले. ही हत्या सोसूने चरणजीत सिंह ग्रेवाल यांच्या सांगण्यावरुन केल्याचेही सोनूने सांगितले. रुपिंदर यांना मारण्यासाठी ग्रेवाल यांनी सोनूला ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

crime
Shocking : पत्नीला अंघोळ करताना तरुणाने पाहिलं, व्हिडीओ बनवून पती विषारी औषध प्यायला अन् पुढे...

अमेरिकन नागरिक असलेल्या रुपिंदर कौर पंढेर यांची हत्या पैशांसाठी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रुपिंदर यांनी भेटीपूर्वीच ग्रेवाल यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले होते. फरार चरणजीत सिंह ग्रेवाल फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. सोनूने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे सांगाडे आणि इतर पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती उपमहानिरीक्षक सतींदर सिंह यांनी दिली आहे.

crime
Pune : वर मेट्रो, खाली बस धावणार! पुण्यात ११ किमीचा डबलडेकर उड्डाणपूल, पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com