Jolly LLB 3  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jolly LLB 3 Collection : अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी ३' चित्रपट १०० कोटींच्या उंबरठ्यावर, मात्र चौथ्या दिवशी कमाईत घसरण

Jolly LLB 3 Box Office Collection Day 4 : 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाच्या चौथ्या दिवशीच्या कलेक्शमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. एकूण कमाई किती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'जॉली एलएलबी 3' चित्रपट 19 सप्टेंबरला रिलीज झाला.

'जॉली एलएलबी 3' हा कॉमेडी कोर्टरूम ड्रामा आहे.

चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये चौथ्या दिवशी घसरण झाली आहे.

गेल्या शुक्रवारी 19 सप्टेंबरला अक्षय कुमारचा (Akshay Kumar)'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. रिलीजनंतर तीन दिवस चित्रपटाने बंपर कमाई केली मात्र सोमवारी कलेक्शनमध्ये घट झाली आहे. 'जॉली एलएलबी 3'हा कॉमेडी कोर्टरूम ड्रामा असून अक्षय कुमार विरोधात अर्शद वारसी पाहायला मिळत आहे. 'जॉली एलएलबी 3' हा जॉली एलएलबी फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे.

'जॉली एलएलबी 3' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

अक्षय कुमारच्या 'जॉली एलएलबी 3'च्या चौथ्या दिवसाची कमाई समोर आली आहे. चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3' ने चौथ्या दिवशी म्हणजे पहिल्या सोमवारी 5.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ज्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन तब्बल 59 कोटी झाले आहे.

'जॉली एलएलबी 3' च्या कमाईत प्रत्येक दिवशी वाढ होत गेली तर चित्रपट लवकरच 100 कोटींचा गल्ला जमावेल. आता येणाऱ्या दुसऱ्याआ वीकेंडला चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • पहिला दिवस - 12.75 कोटी

  • दुसरा दिवस - 20 कोटी

  • तिसरा दिवस - 21 कोटी

  • चौथा दिवस - 5.5 कोटी रुपये

  • एकूण - 59 कोटी रुपये

'जॉली एलएलबी 3' ओटीटी रिलीज

मीडिया रिपोर्टनुसार, 'जॉली एलएलबी 3' चित्रपट थिएटर रिलीजनंतर जिओहॉटस्टार आणि नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. थिएटर रिलीजच्या 60 दिवसांनी नोव्हेंबरला चित्रपट ओटीटीवर येणार. 14 नोव्हेंबर 2025 या तारखेची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये बसमध्ये चोरीचा थरार; दीड लाखांचा मोबाईल चोरीला गेल्याने प्रवाशांची झडती | VIDEO

Maharashtra Live News Update: कार्तिकीची विठ्ठल रूक्मिणी शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना

Airtel Dual SIM Plan: एअरटेलचा डबल धमाका! एकाच प्लॅनमध्ये २ सिम कार्डची सुविधा अन् बरंच काही...

Gold Rate Today: सोन्याची दिवाळी! १० तोळ्यामागे ७१०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा 'चा धुराळा; विजयच्या 'GOAT'ला पछाडलं, 500 कोटींच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT