Jaya Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jaya Bachchan : पापाराझींना पोज दिली अन् हसून साधला संवाद, जया बच्चन यांचा 'तो' VIDEO व्हायरल

Jaya Bachchan Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात त्या पापाराझींसोबत बोलताना आणि हसताना पाहायला मिळत आहेत.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या कायम पापाराझींवर ओरडताना आणि चिडताना पाहायला मिळतात.

मात्र जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात त्या पापाराझींशी हसून बोलताना दिसत आहेत.

जया बच्चन यांना हसत बोलताना पाहून चाहते थक्क झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांचे पापाराझींवर चिडतानाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतात. मात्र सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात जया बच्चन या चक्क पापाराझींशी बोलताना, हसताना दिसत आहेत. व्हिडीओत जया बच्चन पापाराझींना आपली बाजू सांगताना दिसत आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या, जाणून घेऊयात.

जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा जुना आहे. जेव्हा जया बच्चन या अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या एका कार्यक्रमात गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी पापाराझींसोबत संवाद साधला आणि हसून पोज दिली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, "जया बच्चन या पापाराझींना म्हणतात की, मी फोटो देण्यासाठी नेहमी तयार असते. पण जेव्हा काही वैयक्तिक घडते आणि तुम्ही लपून फोटो आणि व्हिडीओ घेता. ते मला आवडत नाही. आता मी किती हसते बघा..."

नेहमी रागवणाऱ्या आणि चिडणाऱ्या जया बच्चन यांनी पापाराझींशी हसतमुख संवाद साधला आणि आपला मुद्दा मांडला. जया बच्चन यांचे बोलणे ऐकल्यावर पापाराझी आपल्या बाकीच्या साथीदारांना रेकॉर्डिंग बंद करण्यास सांगतात. कारण अनौपचारिक गप्पा सुरू असतात. मात्र तेव्हा हसत जया बच्चन म्हणतात की, "जेव्हा मी तयार असते, तेव्हा फोटो आणि व्हिडीओ घेण्यास काही हरकत नाही... पण जेव्हा मी तयार नसते आणि तुम्ही फोटो काढता... तेव्हा माझे रंग बाहेर येतात..."

जया बच्चन यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 2023 साली रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात जया बच्चन या दिसल्या होत्या. त्यांच्या अभिनयाचे चाहते आजही दिवाने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Cider Vinegar: त्वचेवर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर लावल्याने कोणते परिणाम होतात?

IAS Transfers List : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरुच; कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Russia-Ukraine Tension: रशिया युक्रेन युद्ध पुन्हा सुरु, रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला

Mumbai Dadar Fire: दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना आग; 12 वाहने जळून खाक

Ganesh Mandap: गणेश मंडपात पुजाऱ्यासोबत चमत्कार? बेशुद्ध पडलेला पुजारी थेट उठून बसला?

SCROLL FOR NEXT