'परम सुंदरी' चित्रपट रिलीज झाला आहे.
'परम सुंदरी' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
'परम सुंदरी'ने पहिल्याच दिवशी कोटींचा व्यवसाय केला आहे.
बॉलिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth Malhotra ) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor ) गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर त्यांचा 'परम सुंदरी' (Param Sundari) चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. चित्रपटाच्या गाण्यांनी आणि ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता वाढवली होती. काल (29 ऑगस्ट)ला 'परम सुंदरी' चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटाचे कलेक्शन, जाणून घेऊयात.
'परम सुंदरी' हा रोमँटिक कथा आहे. चित्रपटाची कथा दिल्लीतील मुलगा आणि केरळच्या मुलीभोवती फिरते. चित्रपटात दोन संस्कृतींचे सुंदर दर्शन पाहायला मिळते. चित्रपटातील सिद्धार्थ आणि जान्हवीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. चित्रपटात हलकी-फुलकी कॉमेडी देखील पाहायला मिळत आहे. 'परम सुंदरी' चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार जलोटा आहे. 'परम सुंदरी' ने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरची जोडी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी 7 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला चित्रपट किती कोटींचा व्यवसाय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाचे बजेट 40-50 कोटी रुपये आहे. चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. 'परम सुंदरी' चित्रपटावर प्रेक्षकांकडून जास्त चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक चित्रपटातील गाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा- जान्हवी कपूरच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.