'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे.
वल्लरीच्या घरी गणपतीचे आगमन होणार आहे.
पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात नवीन संकट येणार आहे.
'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) मालिकेत तीन वर्षांच्या लीपने अनेक बदल झालेले पाहायला मिळत आहे. मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत वल्लरीच्या नव्या घरात गणपतीचे आगमन (Ganesh Chaturthi Festival) झाले आहे.
घरात आरतीच्या मंगलमय वातावरणात एकीकडे भक्तिभाव तर दुसरीकडे तणाव वाढताना दिसत आहे. नात्यांमध्ये, विश्वासामध्ये आणि कर्तव्यामध्ये संघर्ष उभा राहतोय. स्त्री शक्तीशी संबंधित असा सुंदर गणरायाचा मखर सजवण्यात आला आहे. गणपतीच्या आगमनाने सगळे तणाव, चिंता आणि विघ्न दूर होऊ देत हेच मागणे पिंगा गर्ल्स गणपतीसमोर करतात.
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेच्या आगामी भागांमध्ये वल्लरीला नवे आव्हान स्वीकारावे लागणार आहे. एकीकडे तिच्यासमोर कौटुंबिक दबाव आहे, तर दुसरीकडे तिला तत्वांशी आणि न्यायाशी असलेली निष्ठा कायम ठेवायची आहे. घरातील अनेक सदस्य तिच्या निर्णयाच्या विरोधात उभे राहतात. तरीसुद्धा वल्लरी स्वतःचा मार्ग निवडते. या संघर्षामध्ये नाती तुटतात की अधिक घट्ट होतात, याची उत्सुकता लागली आहे.
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत याचवेळी घरात इतर ठिकाणी देखील अनेक घडामोडी रंगणार आहेत. कुणी खोटे बोलून पैसे उकळण्याचा खेळ खेळत आहे, कुणावर ब्लॅकमेलिंगचे सावट आहे, तर कुणाच्या मैत्रीवर शंका घेतली जात आहे.
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत सध्या गूढता आणि तणाव वाढताना दिसत आहे. सगळ्या बाजूंनी परिस्थिती कठीण होत चालली आहे. पण वल्लरीने घेतलेला ठाम निर्णय कथा एका नव्या टप्प्यावर घेऊन जातो. या प्रवासात तिची कसोटी लागणार आहे. पण त्याचवेळी तिच्या धैर्याचा आणि कर्तव्यनिष्ठेचा अभिमानही व्यक्त होतो. प्रेक्षकांसाठी हे भाग भावनिक तणाव आणि गणपतीच्या मंगलमय वातावरणाचा संगम दाखवणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मालिका खूपच रंगतदार असणार आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.