'बिग बॉस 19' फेम तान्या मित्तल सध्या चांगलची चर्चेत आहे.
'बिग बॉस 19' घरात तान्या 500 साड्या, 50 किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन आली आहे.
तान्या मित्तल एक यशस्वी उद्योजिका आहे.
'बिग बॉस 19'चा (Bigg Boss 19) गेम दिवसेंदिवस अनेक मनोरंजक होत जात आहे. चाहते आता 'वीकेंड का वार'ची आतुरतेने वाट पाहत आहे. पहिल्याच आठवड्यात घरातील सदस्यांनी घरात प्रचंड राडा घातला आहे. या घरात पहिल्या दिवसापासून तान्या मित्तलची चर्चा पाहायला मिळत आहे. घरातही ती आपले स्पष्ट मत मांडताना दिसली आहे. तिच्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिला तिच्या लग्जरी लाइफस्टाइलमुळे अनेक वेळा ट्रोल केले जात आहे. बिग बॉसच्या घरातही तान्या मित्तल काही खास गोष्टी घेऊन आली आहे.
'बिग बॉस 19'च्या घरात देखील तान्या मित्तलची दमदार एन्ट्री झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तान्या मित्तलने बिग बॉसच्या घरी येताना 500 साड्या, 50 किलोचे दागिने, चांदीची भांडी घेऊन आली आहे. ती बिग बॉसच्या घरातील एकमेव सदस्य आहे जिला बिग बॉसने घरातील भांडी आणायला दिली आहे. ती एक व्हीआयपी लाइफस्टाइल जगत आहे.
तान्या मित्तलने (Tanya Mittal) 'बिग बॉस 19'च्या घरात पहिल्या दिवसापासून राडा घातला आहे. तान्याने 'मिस एशिया टूरिझम युनिव्हर्स 2018 ' ही सौंदर्य स्पर्धा जिंकली. ती एक करोड उद्योजकांपैकी एक आहे. तान्या मित्तलने 500 रुपयांपासून सुरुवात करून 'हँडमेड विथ लव्ह बाय तान्या' या हस्तकला ब्रँडची स्थापना केली. तान्या मित्तल तरुण करोडपती उद्योजकाचा किताब मिळाला.
मीडिया रिपोर्टनुसार, तान्या मित्तलची एकूण संपत्ती 2 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. तान्या एक फॅशन इन्फ्लूएन्सर आहे. तान्या उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील पर्यटन मंडळांसोबत काम करते. तसेच तिला एक उत्तम लेखिका आणि कवयित्री म्हणून ओळखले जाते. तान्या मित्तल सामाजिक कार्य देखील करते. विशेषता महिला वर्गासाठी काम करते.तान्या मित्तलने महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ग्वाल्हेरजवळील एक गाव दत्तक घेतले आहे.
सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' शो सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टिव्हीवर पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 19'ची यंदाची थीम राजकारणावर आधारित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.