Param Sundari Review: 'चेन्नई एक्सप्रेस'ची कॉपी आहे 'परम सुंदरी'? वाचा प्रेक्षकांचा रिव्ह्यू

Param Sundari Audience Review: जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा 'परम सुंदरी' हा चित्रपट आज शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे, तो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Param Sundari Review
Param Sundari ReviewSaam Tv
Published On

Param Sundari Audience Review: जान्हवी आणि सिद्धार्थचा रोमँटिक चित्रपट 'परम सुंदरी' हा चित्रपट आज म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट पाहिल्यानंतर, प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत हा चित्रपट कसा वाटला आणि त्या चित्रपटातील कोणती गोष्ट आवडली आणि काय नाही आवडल याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. चला तर जाणून घेऊयात काय आहेत प्रेक्षकांची प्रतिक्रिया.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

जान्हवी आणि सिद्धार्थचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'परम सुंदरी' थिएटरमध्ये प्रदर्शित होताच नेटकरी आणि प्रेक्षकांच्या त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले की हा चित्रपट 'चेन्नई एक्सप्रेस'ची कॉपी नाही तर पूर्णपणे वेगळा आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले की, जान्हवी-सिद्धार्थची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री उत्तम आहे. त्याच वेळी, एका नेटकऱ्याने म्हटले की हा एक अतिशय मनोरंजक चित्रपट आहे. .

Param Sundari Review
Bigg Boss 19: बिग बॉस १९चा विनर आधीच ठरला?; घरात झालेल्या भांडणामध्ये 'या' स्पर्धकाने सगळं सांगितलं

एका नेटकऱ्याने लिहीले की, 'परम सुंदरी' मधील सिद्धार्थ मल्होत्राने छान काम केल आहे, तर जान्हवी कपूरची भाषा फेक वाटली. आणखी एका नेटकऱ्याने लिहीले, चित्रपट चांगला आहे पण, सिद्धार्थ आणि जान्हवी यांना अजून चांगल काम करायची गरज होती.

Param Sundari Review
22 उंदीरमामा, २ मोदक आणि आपले गणपती...; रितेश आणि जिनिलीयाच्या मुलांनी साकारला रोबोटिक्स गणेशा, पाहा VIDEO

परम सुंदरी चित्रपटाबद्दल

'परम सुंदरी' चित्रपटात, सिद्धार्थ मल्होत्रा ​​उत्तर भारतातील परम नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. जान्हवी कपूरने सुंदरी नावाच्या दाक्षिणात्य मुलीची भूमिका साकारली आहे, या दोघांमध्ये प्रेम कसे फुलते यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com