Raveena Tandon: रवीना टंडनने पापाराझींना दिले सोन्याचे कानातले भेट; नेटकऱ्यांनी केले कौतुक, व्हिडीओ व्हायरल

Raveena Tandon: रवीना टंडन तिच्या उदारतेसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती पापाराझींना तिचे सोन्याचे कानातले देताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Raveena Tandon
Raveena TandonSaam Tv
Published On

Raveena Tandon: रवीना टंडन तिच्या उदारतेसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती पापाराझींना तिचे सोन्याचे कानातले देताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन तिच्या उदारता आणि दयाळूपणामुळे अनेकदा चर्चेत असते. आता, एक व्हिडिओ समोर आला आहे जो त्याच्या चाहत्यांच्या खूपच आवडला आहे. रवीना तिच्या मुलीसोबत मुंबई विमानतळावर दिसली. तिथे पापाराझींशी संवाद साधताना तिने तिचे सोन्याचे कानातले त्यांना भेट दिले. हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रवीना टंडनच्या या उदारतेचे चाहते कौतुक करत आहेत.

Raveena Tandon
Yuzvendra Chahal: धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाल्यानंतर युजवेंद्र चहल पोहोचला बाबा निरालाकडे; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओमध्ये अभिनेत्री पापाराझींशी बोलताना दिसत आहे. नंतर पापाराझी रवीनाला तुझे कानातले आवडले असे बोलते. त्यावर ती तिचे कानातले काढून पापाराझींना देते आणि निघून जाते. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर खूप पसंत केला जात आहे. याआधीही रवीनाने तिच्या लग्नातील सोन्याच्या बांगड्या एका सामूहिक विवाहात दान केल्या होत्या, ज्यावरून तिची उदारता दिसून येते.

Raveena Tandon
Sikandar Movie: 'सिकंदर'चे पहिले गाणे 'जोहरा जबीं' रिलीज, सलमान-रश्मिकाच्या जोडीने जिंकली प्रेक्षकांची मनं

रवीना टंडन ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या सामाजिक कार्य आणि धार्मिकदानासाठी ओळखली जाते. याशिवाय, अभिनेत्रीची कारकीर्द देखील खूप मनोरंजक आहे. ती अजूनही चित्रपटांमध्ये काम करते आणि तिच्या अभिनयासोबत फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीतही ती चर्चेत असते.

रवीना टंडनचे चाहते तिच्या पुढील प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही अभिनेत्री 'वेलकम टू जंगल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रवीनासोबत अक्षय कुमार, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर असे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात रवीना पूर्णपणे नवीन भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com