Javed Akhtar Pakistan Lahor faiz festival Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar: याला म्हणतात 'सर्जिकल स्ट्राइक'; जावेद अख्तर यांचा लाहोरमधला VIDEO व्हायरल

तमाम भारतीयांना अभिमान वाटावा, असा अख्तर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

Chetan Bodke

Javed Akhtar Pakistan Lahor faiz festival Viral Video: प्रख्यात गीतकार - शायर जावेद अख्तर यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. 'वाह जावेद साहब वाह!' असं एकच वाक्य भारतीयांच्या पोस्टमध्ये वाचायला मिळतंय. कारणही तसं आहे. तमाम भारतीयांना अभिमान वाटावा, असा अख्तर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

गीतकार जावेद अख्तर हे पाकिस्तानातील लाहोरमध्ये आयोजित केलेल्या फैज फेस्टिव्हल २०२३ मध्ये गेले होते. त्यांनी पाकिस्तानला त्यांचा खरा चेहरा दाखवला. प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटू लागलाय. ही व्हायरल क्लिप बघितल्यानंतर नेटकऱ्यांना सोशल पोस्ट लिहिल्यावाचून राहावलं नाही.

'याला म्हणतात खरी देशभक्ती', 'त्यांचा संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळाला तर बरं होईल', अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. इतकंच नाही तर, काही जणांनी थेट जावेद अख्तर यांना या गोष्टीसाठी भारतरत्नच दिला जावा, अशी मागणी केलीय.

जावेद अख्तर नेमके काय म्हणाले?

जावेद अख्तर यांचा फैज फेस्टिव्हलमधला व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. जावेद अख्तर म्हणताहेत की, 'आम्ही तर नुसरत आणि मेहदी हसन यांचे मोठ-मोठे कार्यक्रम केले. पण तुमच्या देशात लता मंगशेकर यांचा एकही कार्यक्रम झाला नाही, तर हे वास्तव आहे... चला तर, आता आपण परस्परांवर आरोप नको करायला, महत्वाची बाब ही आहे की, सध्याच्या घडीला हवा इतकी गरम आहे, ती कमी व्हायला हवी.'

ते म्हणाले की, 'आम्ही तर मुंबईचे लोक. आमच्या शहरावर कसा हल्ला केला गेला, हे आम्ही बघितलंय. ते लोक नॉर्वेतून, इजिप्तमधून तर नव्हते आले? ते तुमच्या देशात अजूनही मोकाट फिरताहेत. ही तक्रार जर प्रत्येक भारतीयाची असेल तर, तुम्हाला वाइट वाटायला नको.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT