Abhijit Bichukale News: सगळ्या पक्षांना घरी बसवा, महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या; अभिजित बिचुकलेचं आवाहन

अभिजित बिचुकले यांनी महाराष्ट्रातील जनतेला सत्ता त्यांच्या हातात देण्याचे केले आवाहन.
अभिजित बिचकुले
अभिजित बिचकुले Saam Tv

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे. अनेक आरोप-प्रत्यारोप राजकारणी एकमेकांवर करत आहेत. यात आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. बिचुकले त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठीच ओळखले जातात.

अभिजीत बिचुकले यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर वक्तव्य केले आहे. अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "मी लोकशाही मानणारा नागरिक आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथे जातात. मला अद्याप लोकांनी निवडून दिलं नाही. त्यामुळे येत्या काळासाठी मी एवढंच सांगेन की, जे झालं ते पुरे झालं."

अभिजित बिचकुले
Pathan 27th Day Collection: अखेर 'पठान'चा १००० कोटींच्या क्लबमध्ये समावेश, महिन्याभरातच कमावले घवघवीत यश

"आता हे कुणीही असतील शिवसेना उद्धव ठाकरे गट असो वा शिवसेना एकनाथ शिंदे गट असो, जे कुणी असेल त्या सगळ्या पक्षांना एकदाच घरीच बसवा. अभिजीत बिचुकले तुम्हाला एक चांगला पर्याय आहे. असलं राजकारण थांबवायचं जनतेच्या हातात आहे. तुम्ही २०२४ मध्ये महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या”, अशी प्रतिक्रिया बिचुकले यांनी दिली आहे.

अभिजीत बिचुकले त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिजीत बिचुकले यांनी अनेक निवडणूक लढवल्या आहेत. कधी ते आदित्य ठाकरेंविरोधात वरळी विधानसभा निवडणुकीसाठी लढले आहेत. तर कधी पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत उतरले आहेत. कवी मनाचे हे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात येतील नेटकऱ्यांच्या निशाणावर हे येणार काल ठरवेल.

अभिजित बिचकुले
Bacchu Kadu: मोबाईलचं रिचार्ज करून देण्यासाठी दिव्यांग बांधवाचा थेट बच्चू कडूंना कॉल, व्हिडिओ व्हायरल

शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या खाटल्यावर उद्यापासून सलग 3 दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांच्या याचा निर्णयही मेरिट नुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. पुढील ३ दिवस होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष असणारा आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com