Mr And Mrs Mahi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mr And Mrs Mahi ला प्रेक्षकांकडून खास प्रतिसाद नाही, तिसऱ्या दिवशी केली फार कमी कमाई

Mr And Mrs Mahi 3rd Day Collection | जान्हवी कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेले 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Chetan Bodke

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सध्या ह्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. पहिल्या दिवशी दमदार कमाई केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाने फार कमी कमाई केलेली आहे. चित्रपटाने पहिल्या विकेंडला जेमतेम १६ कोटींचीच कमाई केलेली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जान्हवी आणि राजकुमार चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करीत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करेल अशी अपेक्षा होती, पण तसं काही घडलं नाही. जान्हवी आणि राजकुमार यांचा हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असून चित्रपटामध्ये महेंद्र आणि माहीची हटके लव्हस्टोरी पाहायला मिळेल. नुकतंच सॅकल्निक या ट्रेड ॲनालिस्टने चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केलेला आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच १६.८५ कोटींची कमाई केलेली आहे. हा आकडा इतका खास नसून येत्या दुसऱ्या विकेंडला चित्रपट किती कमाई करणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ६.७५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४.६० कोटी, तिसऱ्या दिवशी ५.५० कोटींची कमाई केलेली आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर चित्रपटाचे जोरदार कौतुक होत आहे. विशेषतः राजकुमार आणि जान्हवीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

'मिस्टर अँड मिसेस माही'चे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे. चित्रपटाच्या कथेत क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या कपलची स्टोरी दाखवली आहे. हा चित्रपट एक अयशस्वी क्रिकेटर आपल्या पत्नीला तिची स्वप्ने पूर्ण करण्यास कशी मदत करतो यावर आधारित आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसह प्रमुख भूमिकेत कुमुद मिश्रा, अभिषेक बॅनर्जी, जरीना वहाब आणि राजेश शर्मा सारखे अनेक कलाकार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT