Famous Actor Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : मनोरंजन विश्व हादरले; प्रसिद्ध अभिनेत्याची हत्या, गर्लफ्रेंडच्या मुलाने चाकूने केले सपासप वार

Famous Actor killed By Girlfriend Son : 'टॉप गन: मॅव्हरिक' चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याची राहत्या घरी चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. अभिनेत्याने वयाच्या ८१ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्याची हत्या

गर्लफ्रेंडच्या मुलाने अभिनेत्यावर चाकूने केले वार

अभिनेत्याने वयाच्या ८१ वर्षी अखेरचा श्वास घेतला

मनोरंजन विश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेते जेम्स हँडी (James Handy) यांची हत्या करण्यात आली आहे. 3 जून 2026 रोजी अभिनेत्याचा मृत्यू झाला. जेम्स हँडी यांच्या गर्लफ्रेंडच्या मुलाने अभिनेत्यावर चाकूने सपासप वार करून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नेमंक प्रकरण काय, जाणून घेऊयात.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिनेते जेम्स हँडी यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लॉस एंजेलिस पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी सकाळी अंदाजे ९:३० वाजता, वेस्ट व्हॅली परिसरातील अधिकाऱ्यांना एक निनावी कॉल आला. हा आपत्कालीन कॉल मायकल ग्लेडहिलने केला होता, जो म्हणाला, "मी देवाचा मुलगा आहे, मी नुकताच एका पापी माणसाला मारले आहे..." जेव्हा आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा अभिनेते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ग्लेडहिलने स्वतः आपत्कालीन सेवेशी संपर्क साधून या हल्ल्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगितले. अभिनेते जेम्स हँडी यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कलाकार आणि चाहत्यांनी अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.

जेम्स हँडी कोण?

अभिनेते जेम्स हँडी हे ‘K-9’, ‘टॉप गन: मॅव्हरिक,’ ‘ऑब्सेस्ड,’ ‘जुमानजी’ आणि ‘प्रिझ्युम्ड गिल्टी’ यासारख्या प्रोजेक्ट्ससाठी प्रसिद्ध होते. जेम्स हँडी यांचा जन्म न्यूयॉर्क युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे झाला. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. जेम्स हँडी हे डेव्हिड हेअरच्या 'स्टफ हॅपन्स' या नाटकाचाही भाग होते.1995 मध्ये आलेल्या 'जुमांजी' चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विकेंडला जास्त झोपून आठवडाभराची झोप भरून निघते का?

भाजपच्या दिग्गज युवा नेत्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखल केलं दोषारोपपत्र

Blood Sugar :डायबिटीज नसतानाही वाढू शकते ब्लड शुगर! रोजच्या ‘या’ 7 सवयी ठरतात कारणीभूत

दिशा सालियनचे वडील वकिलांसह मातोश्रीवर दाखल; शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा; हायव्होल्टेज ड्रामा|VIDEO

SCROLL FOR NEXT