अजय दुधाणे, साम टीव्ही
उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात सर्पदंशामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तीन वर्षीय चिमूकल्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन वेळेत उपचार न केल्याचा गंभीर आरोप करत मोठा गोंधळ घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील शिवसंगा परिसरात ही घटना घडली. खेळत असताना विषारी कोब्रा जातीच्या सापाने चिमूकल्याच्या मांडीवर चावा घेतला. घटनेनंतर कुटुंबीयांनी तात्काळ सुमारे साडेअकराच्या सुमारास मुलाला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वेळेत योग्य उपचार न मिळल्यामुळेचे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत निषेध व्यक्त केला. एवढेच नव्हे तर ज्या सापाने चावा घेतला होता तो साप पकडून कुटुंबीयांनी रुग्णालयात आणल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली.
दरम्यान रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर बनसोडे यांनी सांगितले की, मुलाची प्रकृती रुग्णालयात आणताना अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. विशेष म्हणजे, याआधीही उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचाराअभावी नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या असून रुग्णालयात तोडफोड झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.