

उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात गोळीबार
टोळीने भरचौकात तिघांवर गोळीबार केला
गोळीबारात अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण यांचा मृत्यू
अर्जुन चव्हाण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू
उल्हासनगरमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. तिघांवर गोळ्या झाडल्या. उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात ही गोळीबाराची घटना घडली. ७ राऊंड फायर करण्यात आले. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण अशी मृतांची नावं आहेत. तर अर्जुन चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील प्राचीन शिवमंदिर रोड परिसर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे. कैलास कॉलनी चौकातील के.सी ग्रुप कार्यालयाजवळ आज संध्याकाळी एका टोळीने अचानक गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. यावेळी टोळीने तब्बल सात राउंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात अमोल चव्हाण, अनिल चव्हाण आणि अर्जुन चव्हाण हे तिघेजण गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर अर्जुन चव्हाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या गोळीबारात मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात घटनास्थळी तैनात करण्यात आला असून परिसर सील करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत. गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.