Irrfan Khan Birth Anniversary saam tv
मनोरंजन बातम्या

Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानने वाचवला होता जीव; आज 'तो' आहे IPS ऑफिसर, नेमका किस्सा काय?

Irrfan Khan Saves Friends Life In School Time : दिवंगत बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आज दिवंगत अभिनेते इरफान खान यांचा वाढदिवस आहे.

इरफान खान यांच्या अभिनयाचे , चित्रपटांचे आजही चाहते दिवाने आहेत.

इरफान खानने आपल्या जीव धोक्यात घालून लहानपणी आपल्या मित्राला वाचवले होते.

दिवंगत बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचा आज (7 जानेवारी 2026) वाढदिवस आहे. त्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यांच्या अभिनयाचे आजही चाहते दिवाने आहेत. त्याचा अभिनय अव्वल दर्जाचा होता. त्यांनी आपल्या साध्याभोळ्या स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली.

इरफान खान आता या जगात नाहीत. पण त्यांच्या आठवणी आणि किस्से कायम चर्चेत असतात. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी राजस्थानातील टोंक जिल्ह्यात झाला. त्याच्या एक हृदयस्पर्शी किस्सा जाणून घेऊयात. इरफान खानने मित्राचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. तो मुलगा आता आयपीएस अधिकारी बनला आहे. ज्याचे नाव हैदर अली जैदी आहे. त्यांनी हा किस्सा सांगितला होता.

एका मुलाखतीत हैदर अली जैदी यांनी मित्राच्या आठवणीत सांगितल्यानुसार, इरफान खान आणि हैदर अली जैदी हे दोघे लहानपणापासून मित्र होते. शाळा आणि कॉलेजमध्ये एकत्र गेले. एके दिवशी दोघे कॉलेजमधून घरी परत येत होते. तेव्हा हैदरला विजेचा झटका बसला. त्यावेळी कोणीही मदतीला आले नव्हते. तेव्हा इरफान खानने पुढे होऊन हैदरचा जीव वाचवला. इरफानने हैदरला विजेच्या शॉकपासून दूर केले.

इरफान खान यांचे निधन

इरफान खान यांचे निधन 29 एप्रिल 2020 साली झाले. 'पिकू', 'हिंदी मीडियम', 'द लंचबॉक्स' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day Love Letter: आजार, दुरावा आणि अखेरचा निरोप... अडीच वर्षांचं प्रेम अन् आयुष्यभराची पोकळी

Maharashtra Live News Update: घोडबंदर रोडवर भीषण अपघात; ५-६ वाहने धडकली

Raj Thackeray: राज ठाकरेंचे आदेश, मनसे कार्यकर्त्यांनी थेट बॉम्बे धाब्याचा फलक फाडला; पाहा VIDEO

Winter Alert : महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी! परभणीत तापमान ६ अंशावर; इतर जिल्ह्यात हवामान कसं?

DA Hike: ३% की ५%, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT