Famous singers :प्रसिद्ध गायिकेच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, सिनेसृष्टीत शोककळा

Famous Singer Close Relative Death : प्रसिद्ध गायिकेच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले. गायिकेने सोशल मिडिया पोस्ट करून ही दुःखद बातमी सांगितली आहे.
Famous Singer Close Relative Death
Famous singers saam tv
Published On
Summary

सिनेसृष्टीत शोककळा पसरली.

प्रसिद्ध गायिकेच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले.

गायिकेने सोशल मीडियावर पोस्ट करून दुःखद बातमी सांगितली.

मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध गायिकेच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले आहे. मल्याळम गायिका चित्रा अय्यरची बहीण शारदा अय्यर हिचे निधन झाले आहे. ओमानची राजधानी मस्कत येथे शारदा अय्यर राहत होती. ओमानच्या जेबेल शम्स प्रदेशात ट्रेकिंग करताना अपघातात मृत्यू झाला आहे. शारदा अय्यर ही केरळमधील थाझवा येथील रहिवाशी होती. दिवंगत कृषी शास्त्रज्ञ आर.डी. अय्यर यांची ती मुलगी होती.

मीडिया रिपोर्टनुसार, शारदा अय्यर या ओमान एअरच्या एक्स मॅनेजर होत्या. त्यांचा मृत्यू 2 जानेवारी रोजी अपघात झाला. ती ओमानच्या अल दाखिलियाह गव्हर्नरेटमधील जेबेल शम्स प्रदेशात ट्रेकिंग करत होती. ट्रेकिंगचा आनंद घेताना ही भयंकर घटना घडली. शारदा अय्यरच्या अचानक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिची बहीण चित्रा अय्यरने एक भावुक पोस्ट देखील शेअर केली आहे.

चित्रा अय्यरची बहिणीसाठी भावुक पोस्ट

"जा, जा, माझ्या भांडखोर बहिणी! तू खूपच वेगाने धावतेस! पण मी तुला गाठेनच... शेवटी... लवकरच, वचन देते. तुझ्यावर प्रेम आहे...तू खूपच सुंदर आहेस. तू एकदम हॉट आहेस! मी काय करणार? फोनच्या दुसऱ्या टोकावरून तुझ्या त्या त्रासदायक आवाजाशिवाय, जो सतत बडबडत असतो... मी पुढे आयुष्य कसे जगणार?"

शारदा अय्यर ट्रेकिंगला गेली होती तो भाग उंच कड्याचा होता. तो ट्रेकर्समध्ये धोकादायक स्पॉट मानला जातो. मात्र अद्याप मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नाही. 7 जानेवारी 2026 ला थाझवा येथील वडिलोपार्जित घरी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. तिचे पार्थिव ओमानहून केरळला विमानाने घेऊन जात आहे. 11 डिसेंबर 2025 मध्ये शारदाच्या वडीलांचे देखील निधन झाले. कुटुंबातील दोन व्यक्तीच्या जाण्याने चित्रा अय्यरला मोठा धक्का बसला आहे. तिच्या पोस्टवर चाहते, कलाकार , नेटकरी श्रद्धांजलि वाहत आहेत.

Famous Singer Close Relative Death
Shashank Ketkar Video : "पैशाचा विषय काढला की रडतो..."; अखेर शशांक केतकरने केली प्रसिद्ध निर्मात्याची पोलखोल, स्क्रीनशॉटमधील शब्द न शब्द वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com