शशांक केतकरने व्हिडीओ शेअर करून त्याचे पैसे थकवणाऱ्या निर्मात्याचे नाव सांगितले आहे.
प्रसिद्ध निर्मात्याने शशांक केतकरचे तब्बल 5 लाख रुपये थकवले आहेत.
शशांकने निर्मात्यासोबतचे चॉट्स शेअर केले आहे.
मराठी अभिनेता शशांक केतकर गेल्या २-३ दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. शशांक केतकरचे एका मालिकेच्या निर्मात्याकडून मानधन थकवण्यात आले असल्याचे अनेक काळापासून बोले जात आहे. अशात त्याने (4 जानेवारी 2026) ला शशांकने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून निर्मात्याचे नाव न घेता त्याला चांगलेच सुनावले होते आणि आता अखेर (5 जानेवारी 2026) शशांकने एक सविस्तर व्हिडीओ शेअर करून निर्मात्याचे नाव आणि संपूर्ण प्रकरण सांगितले आहे.
शशांक केतकरचे पैसे थकवणारा निर्माता दुसरा-तिसरा कोणी नसून मंदार देवस्थळी आहे. मंदार देवस्थळींनी शशांक केतकरचे तब्बल 5 लाख रुपये थकवलेत आहेत. शशांक केतकरने व्हिडीओसोबत निर्मात्यासोबतच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट देखील लावले आहे. ज्याच स्पष्ट दिसत आहे. शशांक केतकर वारंवार पैशांसाठी मंदार देवस्थळींना मेसेज करायचा आणि निर्माते पैसे आज देऊ , उद्या देऊ असे बोलायचे. अखेर सर्वाला वैतागून शशांक केतकरने हे पाऊल उचलले आहे.
"मी legal action घेतोच आहे पण तूर्तास मंदार देवस्थळी (मंदार दादा) या उत्तम दिग्दर्शकाचा आणि हे मन बावरे या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा pattern तुमच्याही लक्षात यावा या साठी हा video screenshots सकट पोस्ट करतो आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गया वया करतो, darling, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो.
५,००,००० ही एखाद्या साठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. हे मन बावरे या मालिकेचे per day प्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले (मुद्दल) पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे. म्हणजे त्याने payment देताना TDS कापला आणि goverment ला भरला नाही असा दुहेरी गुन्हा केला आहे. बरं ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही...सगळ्यांची आहे. अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहे, पण आत्ता मी फक्त माझ्या साठी बोलतो आहे.
YouTube वर ४ वर्षा पूर्वीच्या काही मुलाखती दिसतील तुम्हाला त्यातही त्याचा हा थापा मारायचा pattern clear दिसतो आणि आमच्या पैशाच केलं काय या बद्दल चकार शब्द काढत नाही तो ! असो, या पुढचा video बाकी सगळ्या legal details सकट असेल लवकरच... याच्यामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामाला मी किंवा team मधला कोणीही जबाबदार नसेल.
इथे हे आवर्जून सांगाव लागेल सगळेच निर्माते असे fraud अजिबात नसतात. त्यामुळे हे फक्त आणि फक्त @mandarr_devsthali याच्या बद्दल आहे. Industry मध्ये अनेक उत्तम निर्माते आहेत. त्यांना नक्की कळेल मी काय म्हणतोय ते. आम्ही उत्तम काम करून तुमच prject चालवतो, तुम्ही वेळेत पैसे देऊन तुमचं काम उत्तम करा!"
मंदार देवस्थळी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आहे. शशांक केतकरने त्यांच्या 'हे मन बावरे' मालिकेत काम केले होते. ही मालिका 2018 -2020 या कालावधीत प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस मुख्य भूमिकेत होते. मालिकेतील अनेक कलाकारांनी निर्मात्यावर मानधन थकवल्याचे आरोप केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.