Shreya Maskar
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतच कुठेतरी ट्रिप प्लान करायची असेल तर मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बेस्ट लोकेशन आहे. येथे थंडीत आवर्जून भेट द्या.
मुंबईत बोरीवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे. जे परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे लहानांपासून - मोठ्यापर्यंत सर्वांना मजा-मस्ती करता येते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्यावर तुम्हाला जवळून वन्यजीव पाहायला मिळतात. येथे माकड, सांबर, हरीण असे विविध प्राणी पाहाता येतात. त्यामुळे लहान मुलांना येथे आवर्जून घेऊन जा.
तुम्हाला जर ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही कन्हेरी लेणी पर्यंत ट्रेक करू शकता. हा जंगल ट्रेक करायला तुफान मजा येते.
तसेच तुम्ही संपूर्ण नॅशनल पार्कची सफर सायकलवर करू शकता. येथे अनेक मुलं सायकलिंगचा आनंद घेताना दिसतात. बोरीवलीतील लोकांसाठी हे विरंगुळ्याचे सुंदर लोकेशन आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान मुलांना खेळता येईल असे गार्डन आहे. येथे झोपाळा, घसरगुंडी पाहायला मिळते. त्यामुळे लहान मुलं येथे तुफान मजा-मस्ती करतात.
वेस्टन लाइनवरून बोरीवलीसाठी ट्रेन पडका. त्यानंतर बोरीवली स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा चालत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला पोहचाल. सकाळी लवकर जा जेणेकरून संपूर्ण पार्क फिरता येईल.
तुम्हाला जर एकाच ठिकाणी फोटोशूटसाठी वेगवेगळी ठिकाणे हवी असतील तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला आवर्जून भेट द्या. स्वस्तात मस्त फोटोशूट करता येईल.