Shreya Maskar
पुण्याजवळ असलेला ऐतिहासिक सिंहगड किल्ला (पूर्वीचा कोंढाणा) हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील एक महत्त्वाचा किल्ला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सरदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्यासाठी सिंहगड किल्ला प्रसिद्ध आहे.
"गड आला पण सिंह गेला" अशी घोषणा आजही आपण अभिमानाने देतो. यामुळेच सिंहगड नाव मिळाले. ट्रेकर्स व इतिहासप्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
तानाजी मालुसरे यांनी सिंहगडच्या लढाईत मुघलांविरुद्ध लढताना आपले प्राण गमावले. तुम्ही किल्ल्यावर भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
सिंहगडावरून झुंजार बुरूज, दारुगोळ्याचे कोठार, तलाव आणि आजूबाजूच्या दऱ्यांचे विहंगम दृश्य हे किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे.
सिंहगड किल्ला इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे मित्रांसोबत ट्रेकिंगचा प्लान करू शकतात. तसेच येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या उंच कड्यांवर वसलेला असल्यामुळे नैसर्गिकरित्या अभेद्य आहे. पु्ण्यातील हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. रोज येथे हजारो पर्यटक येतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.