Shreya Maskar
उल्हास व्हॅली हे कर्जतजवळचे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. जे विशेषतः पावसाळ्यात, हिवाळ्यात ट्रेकिंग, धबधबे आणि साहसी क्रियाकलापांसाठी प्रसिद्ध आहे.
उल्हास व्हॅलीतून वाहणारी उल्हास नदी पाहायला पर्यटक येथे आवर्जून येतात. मुंबई आणि पुण्यातील लोकांसाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे.
कोंढाणा लेणी उल्हास व्हॅलीमधील प्राचीन बौद्ध लेणी आहेत. जी सुंदर धबधबे आणि घनदाट जंगलांनी वेढलेली आहेत. येथे लहान मुलांसोबत नक्की जा.
कर्जत स्टेशनला उतरून तुम्ही पुढे टॅक्सीने उल्हास व्हॅलीला जाऊ शकता. या प्रवासासाठी सकाळी लवकर निघा म्हणजे संध्याकाळी लवकर घरी पोहचला आणि तेथे मजा-मस्ती देखील करता येईल.
उल्हास व्हॅली हे पश्चिम घाटातील एक विलोभनीय ठिकाण आहे. जिथून हिरवीगार डोंगररांग, घनदाट जंगल आणि उल्हास नदीचे मनमोहक दृश्य दिसते.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे दृश्य अत्यंत सुंदर आणि नयनरम्य असते. जिथे धबधबे आणि झरे यांचा अनुभव घेता येतो. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
उल्हास व्हॅली हे ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, कॅम्पिंग, रिव्हर राफ्टिंग, रॅपलिंग आणि इतर साहसी खेळांसाठी खूप प्रसिद्ध ठिकाण आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.