Shreya Maskar
रामगड किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामगड गावात, कणकवली आणि मालवणजवळ स्थित आहे.
रामगड किल्ला गडनदीच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता, जिथे नदी समुद्राला मिळते.
रामगड किल्ल्याचा वापर जलवाहतूक आणि व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात असे, जो मराठ्यांच्या महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक होता.
रामगड किल्ल्यावर तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार आणि काही अवशेष आढळतात. उदा. जुन्या तोफा, वाड्यांचे अवशेष
रामगड किल्ला ट्रेकिंगसाठी ओळखला जातो. सभोवतालच्या सुंदर दृश्यांमुळे येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
रामगड किल्ला जांभा दगडाची मजबूत तटबंदी, १५ बुरुज, ३ दरवाजे, गणपतीची मूर्ती आणि वेताळदेवाचे देवस्थान यासाठी प्रसिद्ध आहे.
हिवाळ्यात आणि पावसाळ्यात रामगड किल्ल्याला भेट द्या. थंड वातावरणात मन रिफ्रेश होते. तसेच तुम्हाला इतिहासाची आठवण होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.