Shreya Maskar
भानगड किल्ला राजस्थानमध आहे. हे भारतातील रहस्यमय ठिकाण आहे. हे भुतांच्या कथांसाठी प्रसिद्ध आहे.
भानगड किल्ल्याला गेल्यावर भव्य वास्तुकला, सुंदर मंदिर, हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो. येथे गोपीनाथ मंदिर (भगवान विष्णूला समर्पित) आणि हनुमान मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत.
भानगड किल्ल्यावर सूर्यास्तानंतर प्रवेश करण्यास मनाई आहे. कारण येथे काळोखात अजून भयानक वातावरण अनुभवायला मिळते.
भानगड किल्ला 'आशियातील सर्वात भुताटकीचा किल्ला' म्हणून प्रसिद्ध आहे. असे अनेक ठिकाणी बोले जाते.
भानगड किल्ल्यावर सुंदर राजवाडे (पॅलेस), हवेल्या आणि बाजारपेठेचे अवशेष आजही पाहायला मिळतात, जे एकेकाळच्या वैभवशाली शहर होते.
भानगड किल्ला अरावलीच्या डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेला आहे. जो सरिस्का अभयारण्याच्या सीमेवर येतो
भानगड किल्ला 16-17 व्या शतकात बांधला असल्याचे बोले जाते. भानगड किल्ल्यावर एकेकाळी10,000 लोक राहतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.