Shreya Maskar
पैठणला धार्मिक, ऐतिहासिक, कलात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. नवीन वर्षात येथे आवर्जून भेट द्या.
पैठण हे संत एकनाथांचे जन्मस्थान, सातवाहन काळातील राजधानी, 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे.
पैठणला आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि कलात्मक वारसा लाभला आहे. येथे अनेक मंदिरे पाहायला मिळतात.
पैठण हे सुंदर, नक्षीदार पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे आकर्षक रंगसंगती आणि भरत काम असलेल्या साड्या पाहायला मिळतात.
पैठण हे संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थळ असून, फाल्गुन वद्य षष्ठीला येथे मोठी यात्रा भरते आणि लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहराजवळ बांधलेले आहे.
हिवाळ्यात पैठणला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला थंड वातावरण अनुभवता येईल. फॅमिली ट्रिपसाठी पैठणी बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे तुफान मजा-मस्ती करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.