Narayn Murthy Remark On Kareena Kapoor Synopsis Instagram
मनोरंजन बातम्या

Narayan Murthy And Kareena Kapoor News: 'इन्फोसिस'च्या नारायण मूर्तींची करिना कपूरच्या कृतीवर तीव्र नाराजी, विमानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Narayan Murthy On Kareena Kapoor: इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी करीना कपूरचा विमानातील एक किस्सा शेअर केला आहे.

Chetan Bodke

Narayan Murthy Remark On Kareena Kapoor Synopsis: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच आपल्या फॅशनसाठी चाहत्यांमध्ये चर्चेत असते. नुकताच इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी करीना कपूरचा विमानातील एक किस्सा शेअर केला आहे, सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत नारायण मूर्ती म्हणतात, करीना कपूर तिच्या चाहत्यांकडे दुर्लक्ष करते. एकदा ते आणि करीना एकाच फ्लाइटमधून प्रवास करत होते. त्यांनी स्वतः करीना चाहत्यांसोबत कशाप्रकारे वागते, हे पाहिले आहे.

हा व्हिडिओ जुना असून व्हायरल व्हिडीओत, नारायण मूर्ती आणि पत्नी सुधा मूर्ती यांनी एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. दरम्यान, नारायण मूर्ती यांनी करिना कपूरने तिच्या चाहत्यांकडे केलेल्या दुर्लक्षावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुधा मूर्ती यांनी करीना कपूरची बाजू घेत, पती नारायण मूर्तींना शांत करण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी नारायण मूर्ती यांनी त्यांची संपूर्ण बाजू मांडली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत नारायण मूर्ती म्हणतात, “एकदा मी लंडनवरून येत होतो. त्यावेळी माझ्या शेजारच्या सीटवर करीना कपूर बसली होती. तिला अनेक चाहत्यांनी तिच्या जागेवर येऊन तिची विचारपूस देखील केली. पण तिने साधी तिच्या चाहत्यांना प्रतिक्रिया देखील दिली नाही. मला तिच्याकडे काही काळासाठी आश्चर्य वाटलं. आमच्याशी बोलायला देखील अनेक लोकं आले होते. आम्ही आपुलकीने थोडा वेळ का होईना त्यांच्यासोबत उभे राहून बोलत होतो.” त्यानंतर सुधा मूर्तींनी नारायण मूर्तींना सांगितले की, ‘करीनाचे लाखो चाहते आहेत, कदाचित ती त्यांना भेटून भेटून थकली असावी.’

सुधा मूर्ती यांचे ते मत ऐकून उपस्थितांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. सुधा पुढे म्हणतात, “नारायण मूर्ती हे एका संस्थेचे संस्थापक आहेत, एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनीयरचे १०,००० फॅन्स असू शकतात, परंतू एका चित्रपट सेलिब्रिटीकडे १० लाख फॅन्स असू शकतील.” पण सुधा यांनी नारायण मूर्ती यांना खूप काही समजवले तरी, त्यांनी काही ऐकले नाही.

नारायण मूर्ती म्हणतात, “हा मुद्दाच नाही. विषय असा आहे की, जेव्हा कोणी आपल्याबद्दल आपुलकी दाखवते, त्यावेळी तुम्ही त्यांना आपल्याकडूनही प्रत्युत्तर द्यावे. आपण समोरच्या व्यक्तीला आपुलकीने उत्तर दिल्याने त्यांच्या प्रती आपली प्रतिमा चांगली राहते. आपण नेहमीच अहंकारात राहू नये.”

अभिनेत्री करीना कपूरबद्दल बोलायचे तर, तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये डेब्यू करून २३ वर्ष पूर्ण झाली असून तिची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. करिनाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर, करीना रिया कपूरच्या ‘द क्रू’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिच्यासोबत तब्बू, क्रिती सेनॉन आणि दिलजीत दोसांझ देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT