मनोज वाजपेयी बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. गँग्स ऑफ वासेपूर, गुलमोहर आणि सत्यासह अनेक चित्रपटामध्ये मनोज वाजपेयीने विविध भूमिका साकारल्या आहेत. या हरहुन्नरी कलाकारांकडे १७० कोटींची संपत्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एका मुलाखतीत मनोज वाजपेयीला त्याच्या १७० कोटींच्या संपत्तीविषयी विचारण्यात आलं. हे ऐकून मनोज वाजपेयींना धक्काच बसला. त्यानंतर मनोजने या सर्व अफवा असल्याचे सांगितले. ५४ वर्षीय यशस्वी अभिनेता मनोज वाजपेयींच्या सांगितले की, मी ज्या प्रकारची कामे केली आहेत, ते पाहता इतके पैसे कमावणे खूपच कठीण आहेत.'
दरम्यान मनोज वाजपेयीने सांगितले की, मी अलिगढ आणि भोसलेसारख्या चियत्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटातून मला खूप जास्त पैसे मिळाले नाहीत. मी आजही पैसे कमविण्यासाठी संघर्ष करत आहे. तर अगदी मिश्कील शैलती त्याने सांगितले की, माझा संघर्ष वाचून निर्माते माझे मानधन वाढवतील अशी अपेक्षा करतो.' (Latest Entertainment News)
तसेच मनोज वाजपेयीने त्याच्या संपत्तीविषयी निर्माण झालेल्या या अफवांवर गंमतीशीर शैलीत उत्तर दिले की, माझ्याकडे इतके पैसे असायला हवे होते, कमीत कमी मी खूप दूर कुठेतरी गेलो असतो. आयुष्य खूप सहज झालं असत.'
दरम्यान मनोज वाजपेयीला विचारण्यात आले की, एखादं नवीन प्रोजेक्ट साइन करताना तुम्ही कोणत्या गोष्टी विचारत घेता. त्यावर उत्तर देत मनोज म्हणाले, 'सुरुवातीला मी कधीच पैशाला प्राधान्य देत नाही. एव्हढाच नाहीत तर अशा गोष्टी माझ्या डोक्यात पण येत नाहीत. जर असा असत तर मी २५ वर्षांपूर्वीच हे सगळं केलं असत. मी फक्त आणि फक्त पैशांसाठी काम करणार नट नाहीये'
मनोज वाजपेयी पुढे म्हणाले की, माझ्यासाठी काम जास्त महत्त्वाचे आहे. तसेच प्रेक्षकांकडून मी अपेक्षा करतो की त्यांचे प्रेम मला नेहमी मिळत राहो.'
गेल्या ३० वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आपली छाप सोडणार मनोज वाजपेयी 'सिर्फ एक बंदा काफी है' या वेबसीरीजमध्ये शेवटचा दिसला होता. हे वेबसीरीज प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
फॅमिली मॅनच्या २ सीजनच्या यशानंतर मनोज वाजपेयी फॅमिली मॅन ३ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.