नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग ही खूप गोड जोडी आहे. दोघेही नेहमीच काही ना काही नवीन घेऊन येत असतात. भूषण कुमार निर्मित 'दिल बेचारा' हे त्यांचे नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. हे गाणे लाखो रसिकांच्या हृदयावर राज्य करण्यासाठी सज्ज आहे. या प्रेमगीतातून प्रियकर आणि प्रेयसीच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
'दिल बेचारा' नेहा कक्करच्या शानदार कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरेल. तिने पहिल्यांदाच म्युजिक काम्पोजिशन केले आहे. पती रोहनप्रीत सिंग सोबत नेहाने गाण्याचा काही भाग लिहिला आहे.
क्रेविक्सा दिग्दर्शित, 'दिल बेचारा' या म्युझिक व्हिडिओमध्ये या जोडप्याची केमिस्ट्री अगदी सुंदरपणे कॅप्चर केली आहे. नेहा आणि रोहनप्रीत यांच्यातील राहता आपण गाण्यात पाहू शकतो. दोन्ही कलाकारांच्या केमिस्ट्रीने गाण्याला अधिक ग्रेस प्राप्त झाला आहे. जे रसिकांचे लक्ष वेधून घेते. (Latest Entertainment News)
नेहा कक्करने तिचा या गाण्यातील अनुभव शेअर करताना सांगितले की, "'दिल बेचारा' माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे कारण एक कलाकार म्हणून मला नवीन शिकण्याची संधी मिळाली आहे. माझ्या श्रोत्यांसोबत प्रेमाचा हा भावनिक प्रवास शेअर करताना मी खूप उत्सुक आहे आणि मला खात्री आहे की सर्वांना हे गाणे आवडेल."
रोहनप्रीत सिंग म्हणतो, "'दिल बेचारा' हे फक्त एक गाणे नाही; या गाण्यातून प्रेम, तळमळ आणि रिलेशन स्पेशल बनवणारी प्रत्येक गोष्ट व्यक्त होते. नेहासोबत हे सुंदर गाणे कंपोज करणे हा एक अप्रतिम अनुभव होता आणि मला आशा आहे की आमच्या श्रोत्यांना तेच प्रेम आणि भावना आवडतील. ज्या आम्ही त्यात ओतल्या आहेत."
दिग्दर्शक क्रेविक्सा म्हणतात, "नेहा आणि रोहनप्रीत यांच्यातील केमिस्ट्री धमाल करणारी आहे, ते पडद्यावर एक नैसर्गिक अट्रॅक्टशन आणतात. त्यांनी या गाण्यात त्यांच्या व्यक्तिरेखेसह एक खरेपणा जपला आहे, ज्यामुळे या व्हिडिओचे सौंदर्य टिकून राहिले आहे."
T-Series चे दिल बेचारा हे गाणे नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले असून गायले देखील आहे. क्रेविक्साद्वारे दिग्दर्शित, हा म्युजिक व्हिडिओ आता T-Series च्या YouTube चॅनेलवर उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.