Bad Road In Mumbai Filmcity : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर नेहमीच मराठी कलाकारांच्या आणि चित्रपटांच्या बाजूने उभे असतात. चित्रपटाला निर्मिती असो किंवा मराठी चित्रपटांची थिएटर्स मिळविण्यासाठीची लढाई असो. कलाकारांचे, वाहिन्यांचे तसेच चित्रपटाचे अनेक प्रश्न हाताळताना महाराष्ट्र सैनिक पाहायला मिळतात.
अमेय खोपकर यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी मुंबईतील एक मोठा प्रश्न पुन्हा उपस्थित केला आहे. फिल्मसिटीत जाण्यासाठी अनेकांना खूप त्रास सहन करावा लागत आहेत आणि त्याचसाठी अमेय खोपकर पुढे सरसावले आहेत.
अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मुंबईला मायानगरी म्हणतात ते या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमुळे. इथे ४२ आउटडोअर शूटिंग लोकेशन्स आणि १६ स्टुडिओ फ्लोअर्स आहेत. (Latest Entertainment News)
टीव्ही मालिका, चित्रपट यांच्या शूटिंगसाठी हजारो माणसं इथे उपनगरातून येत असतात, पण आत प्रवेश केल्यावर अशा घाणेरड्या रस्त्यांवरुन ये-जा करावी लागते. ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत? तुम्ही सुविधाच दिल्या नाहीत म्हणून उद्या हा चित्रपटउद्योग राज्याबाहेर गेला तर त्यांना चूक तरी कसं म्हणणार?'
अमेय खोपकर यांनी हे ट्विट करत फिल्मसिटीमधील रस्त्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. या ट्विटच्या माध्यामातून अमेय खोपकर यांनी फिल्मसिटीमध्ये ये-जा करणाऱ्या अनेक कामगार आणि कलाकारांना होणारा त्रास सांगितला आहे. तसेच सरकारचे एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.